SAFF Championship – पाकिस्तानचा रडीचा डाव, स्पर्धेपूर्वीच माघार घेतली; गोव्यात रंगणार हिंदुस्थानसह सहा देशांमधील थरार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गोव्यात येत्या 25 मे पासून आयोजित होणाऱ्या SAFF Women’s Championship 2026 मधून पाकिस्तानने अधिकृतपणे काढता पाय घेतला आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान दोन्ही देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे पाकिस्तान फुटबॉल महासंघाने हा निर्णय घेतला असून, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाने (SAFF) आता सहा संघांसह ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 25 मे ते 6 जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल. याआधी 2016 मध्ये सिलिगुडी येथे झालेल्या स्पर्धेनंतर हिंदुस्थान दुसऱ्यांदा या चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवत आहे. विशेष म्हणजे, 1999 मधील पुरुष सॅफ चॅम्पियनशिप देखील याच मैदानावर पार पडली होती, जिथे हिंदुस्थानने बांगलादेशचा पराभव करून जेतेपद पटकावले होते.

पाकिस्तानने माघार घेतल्यामुळे आता हिंदुस्थान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि मालदीव या सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होईल. यापूर्वी पाकिस्तानने तामिळनाडूतील ज्युनियर हॉकी विश्वचषक आणि राजगीर येथील आशिया कपमधूनही माघार घेतली होती. हिंदुस्थान संघाने ही स्पर्धा आतापर्यंत पाच वेळा जिंकली असून, बांगलादेश सध्याचा गतविजेता संघ आहे.

Comments are closed.