आमदार संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या प्रकाशकाला पोलिसांनी काय सांगितलं, गुन्

शिवाजी कोन्होटा पुस्तकावर संजय गायकवाड: कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ (Shivaji Kon Hota) या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरुन प्रशांत आंबी यांना अत्यंत अभद्र भाषेत शिव्या दिल्या होत्या. याविरोधात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur News) राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. (Maharashtra Politics news)

प्रशांत आंबी यांनी पोलिसांकडे संजय गायकवाड यांच्याविरोधात रितसर आणि सविस्तर तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी सांगितले की, आम्हाला आमच्या लीगल टीमशी बोलावं लागेल. मी पोलिसांनी तक्रार दिली असून त्यामध्ये कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, तेदेखील नमूद केले आहे. पोलिसांनी मला तक्रार मिळाल्याची पोचपावती दिली असून गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत दोन दिवसांत माहिती देऊ असे सांगितल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली.

प्रशांत आंबी यांनी तक्रार अर्जात संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, हेदेखील नमूद केले आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम 351 (3), कलम 352, कलम 356, कलम 192 व मानवी हक्क संरक्षण कायदा  आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली आहे.

Prakash Ambedkar: संजय गायकवाड प्रकरणात प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

Sanjay Gaikwad on Shivaji Kon hota Book: शैक्षणिक ‘घोडदौड’ इयत्ता नववीतच थांबली, बायकोला गिफ्ट मिळालेल्या पुस्तकाचं शीर्षक बघून संजय गायकवाडांनी मुक्ताफळं उधळली

Sanjay Gaikwad and Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांना एकेरी बोलणारा गोविंद पानसरे कोण, त्याला भेटायला वर जायचंय का? आमदार संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी

आणखी वाचा

Comments are closed.