अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार; सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी त
बारामती : राज्यात एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणासह अन्य अघोरी बाबा आणि इतर भोदूबाबाचे कारनामे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित झाला या नंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही याप्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे. आता, याप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी विद्या प्रतिष्ठान एआय इमारत बांधकामजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा मांडल्याची माहिती देत फोटो देखील शेअर केले आहेत, त्याचबरोबर दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते त्याआधी रात्री अशी अघोरी पूजा मांडल्याचं बोललं जात आहे.
28 डिसेम्बर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ मध्य रात्री मांडलेली ही अघोरी पूजा !!
दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते.#भयपट pic.twitter.com/H01JpwtRYM— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 24 एप्रिल 2026
Amol Mitkari : राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक
अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दोन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केला आहे. अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘बारामती मध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणार्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेंत.डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ ही अघोरी पूजा मध्य रात्री मांडली होती आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते’, अशी माहिती अमोल मिटकरींनी पोस्ट केली आहे.
Amol Mitkari : दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी
बारामती मध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणार्यांना शक्य नाही, तर तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही…
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 24 एप्रिल 2026
तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की, ’28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ मध्य रात्री मांडलेली ही अघोरी पूजा !! दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते.#भयावह’, अशी पोस्ट लिहून त्यांनी मांडलेल्या अघोरी पुजेचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
अमोल मिटकरी : अघोरी पूजेला बकरी उलटी लटकवा
तर आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय की, खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य 🥹विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला? हे भयंकर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे.#भय इथले संपत नाही.
खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य 🥹विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं.अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात… pic.twitter.com/6Hy136tRqr
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 23 एप्रिल 2026
आणखी वाचा
Comments are closed.