गिरीश महाजनांना खडेबोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीची पोलिसांत तक्रार, न

गिरीश महाजन आणि झेन सदावर्ते: मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जाब विचारणाऱ्या आणि वाहतूक कोंडीवरून संताप व्यक्त करणाऱ्या महिलेविरोधात आता पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची कन्या झेन सदावर्ते (Zen Sadavarte) हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

Women Angry on Girish Mahajan : नेमकी घटना काय?

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानापासून एनएससीआय डोमपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका स्थानिक महिलेने आपला संयम गमावला आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना प्रश्नांचा भडिमार केला. “तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा! तुमच्या मोर्चामुळे शेकडो लोक अडकले आहेत,” अशा शब्दांत महिलेने महाजनांना खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Zen Sadavarte: झेन सदावर्तेची पोलिसात तक्रार

आता वरळी येथे झालेल्या मोर्चादरम्यान घडलेल्या प्रकारावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने तक्रार दाखल केली आहे. मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या एका महिलेने पोलिस बंदोबस्तात असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस स्थानकात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. आता झेन सदावर्तेच्या तक्रारीनंतर वरळी पोलीस या महिलेवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Girish Mahajan: गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की, आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचं होतं. पुढच्या वेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती.

आणखी वाचा

Mumbai Women Angry Girish Mahajan Video: पोलिसांना नडली, गिरीश महाजनांना तोंडावर म्हणाली, इथून चालते व्हा…; महिला का चिडली, नेमकं काय घडलेलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.