बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं….; अद्याप तपास नाही, त्या बोकडाचा अन् सोमवती अ
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली. हा घातपात आहे की घातपात हे शोधावं असंही ते म्हणालेत त्याचबरोबर मिटकरींनी (Amol Mitkari) अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरासमोर झालेल्या अघोरी पुजेचा, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा आणि या विमान अपघाताचा काही संबंध आहे का हे तपासावं अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना एसआयटीकडे केली आहे, त्यांनी आज अजित पवारांच्या घरासमोर आणि काटेवाडीतील बंगल्याजवळ झालेल्या अघोरी पुजेबाबत पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. याबाबत देखील त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे.(Amol Mitkari)
Amol Mitkari: झाडाला एक बोकड टांगलं होतं
यावेळी बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, मी गेल्या पाच दिवसांपासून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीमध्ये आहे, बऱ्याच लोकांशी चर्चा केली. काल पण दिवसभर मी काल निवडणुकीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गेलो होतो, लोक भेटतात, आभार मानतात की, तुम्ही दादांचा मुद्दा लावून धरला, दादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर आलं पाहिजे आणि मग काल एका ठिकाणी फिरत असताना दादांचा काटेवाडीचा जो बंगला आहे. त्या परिसरात फिरत असताना तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की, इथे एक झाड आहे. त्या झाडाला एक बोकड टांगलं होतं, आणि ते बोकड दादांच्या विमान अपघाताच्या काही दिवसापूर्वीच टांगलेलं आहे. त्यानंतर मी तिथे व्हिजिट करायला गेलो. तिथे एक कवडी सापडली, तिथे कवड्या टाकलेल्या आहेत, काळी बाहुली होती त्याच्यात लिंबू मिरच्या अशा टाकलेल्या होत्या, काहीतरी हा अघोरी पूजेचा एक प्रकार दादांच्या काटेवाडीच्या बंगल्याच्या बाहेर घडला. ते मी ट्विट केलं होतं, काही दिवसांपूर्वी आपणच बातमी दाखवली होती की, दादांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या बाहेर भिगवण रोड वरती देखील अशाच प्रकारची एक पूजा झाली होती आणि तिसरं असं म्हणजे आज सकाळी जे व्हीपी च्या इथे गेलो, तिथेही मला काल काही ग्रामस्थांनी दाखवलं. तिथे दोन काळ्या भावल्या आहेत, त्यांना हिरवे वस्त्र घालून त्याच्यावर लिंबू रोवलं आहे आणि ही पूजा सुद्धा 28 डिसेंबर 2025 ला ज्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या बाजूला जे एआयचे इमारतीचे बांधकाम झालं आहे, त्याच्या उद्घाटनासाठी दादा येणार होते, त्याच परिसरात ही पूजा पार पडली होती, असंही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.(Amol Mitkari)
Amol Mitkari: ईशानेश्वर मंदिरामध्ये ज्या काही अघोरी पूजा घडवल्या
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, त्याचबरोबर जे बोकड कापलेलं होतं, ते साधारणपणे 19 जानेवारी 2026 रोजीचं, दादांच्या विमानाचा अपघात झाला 28 जानेवारी 2026 रोजी, 19 जानेवारी 2026 ला एक वाजून 21 मिनिटांनी पहाटे सोमवती अमावस्या संपलेली आहे. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती मध्ये फिरलेलो असताना अनेक लोकांकडे अनेक उदाहरणं अशी आहेत, त्या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. अंधश्रद्धा न मानणारे आम्ही लोक आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही विज्ञानवादी आहोत, पण हा अँगल अंधश्रद्धेकडे जातोय. तर यात कॅप्टन अशोक खरातची या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, त्यांचे बॅक खाते चेक करावी अशी मागणी देखील अमोल मिटकरींनी केली आहे. त्याच्या ईशानेश्वर मंदिरामध्ये ज्या काही अघोरी पूजा घडवल्या गेल्या, त्या म्हणजेच मठात 28 जानेवारीला काही ट्रांजेक्शन त्याच्या खात्यात झाले आहेत का?, माझा स्पष्ट आक्षेप आहे. एसआयटीने जर व्यवस्थित चौकशी केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जr काही त्यांनी मागणी केली आहे त्या अनुषंगाने जर ही चौकशी झाली तर सगळं समोर येईल, असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
Amol Mitkari: ईशान्य ईश्वर महादेवावर रक्ताचे अभिषेक झालेत का?
तर पहिल्यांदा पशुबळी दिला जातो, त्यानंतर नरबळी दिल्या जातो, मध्यंतरी आमदार रोहित पवारांनी सांगितलं होतं की, दादांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या होत्या त्या आश्रमामध्ये, मग तिथून इथं काही धागा आहे का, रक्ताचे अभिषेक त्याच्या आश्रमात झालेत का?, सोमवती अमावस्येला ईशान्य ईश्वर महादेवावर रक्ताचे अभिषेक झालेत का?, आणि हे बाहेरच्या लोकांकडून शक्य नाही. इथल्याच काही लोकांचा आधार घेऊन या पूजा घडवत होते, असा माझा स्पष्ट आक्षेप आहे, अजित दादांचा जो विमान अपघात झाला तर अजितदादांसारखा विज्ञानवादी माणूस या फालतू गोष्टीला बळी कसा पडला हे यावरून मला सांगायचं आहे, असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
Amol Mitkari: एका दिवसाच्या मुलाचा मुंडक मारलं गेलं होतं
मी माझ्या पोस्टमध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे, बारामतीमध्ये सहयोग घर असेल, काटेवाडीचे घर असेल, दादांचा विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ज्या काही अघोरी पूजा झालेले आहेत, यांच्याशी ज्या पद्धतीने अभिषेक करणारी काही लोक आता येतील ते एसआयटीच्या चौकशीत समोर, पण ते तिथून येऊन इथं करू शकत नाहीत, दादांच्या बंगल्या बाहेर तुम्ही ही पूजा बांधा, असं ते इथल्या लोकांना सांगत असतील, हे बाहेरच्या लोकांना शक्य नाही, पण इथं समजा माझा मित्र परिवार असेल, मी तुम्हाला एखादं बारामतीतलं काम सांगितलं, तर तुम्ही करणारच ना. तसं मित्र प्रेमापोटी करणार, पण काही आर्थिक लालसा देऊन तुम्हाला करून घ्यायला लावणार असंही होऊ शकतं. बारामती मध्ये एक प्रकरण मला असं कळलं की नरबळीच माहित पडलं आहे की, एका दिवसाच्या मुलाचा मुंडक मारलं गेलं होतं आणि ते जमिनीत पूरलं गेलं होतं. अद्यापही, त्या मागचा कुठलाही आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे इथल्या काही लोकांना हाताशी धरून बाहेरच्या काही लोकांनी हा प्रकार केल्याचा माझा मत आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Amol Mitkari: अशोक खरात प्रकरणात तुम्ही फक्त ट्रांजेक्शन
या सगळ्या वरती एसआयटीची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बारामती मध्ये स्वतः शब्द दिलेला आहे की दादांच्या विमान अपघाताचा सत्य आम्ही जनतेसमोर आणू, ते कधी आणणार तो फक्त टाईम पिरेड त्यांना दिलेला नाही. माझी मागणी हीच आहे की कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तुम्ही फक्त ट्रांजेक्शन आणि त्याचे अश्लील व्हिडिओ एवढ्या अँगलने ते तपास करू नका त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विश्वासात घेऊन ज्या ज्या ठिकाणी या अघोरी पूजा झाल्या आहेत , त्याची वस्तुनिष्ठ माहिती घ्या आणि ते बोकड टाकलेले आहे, त्याचा एकदा पोस्टमार्टम करा. म्हणजे त्यात नेमकं काय आहे. ते समोर येईल, कारण आता चार महिने होतील 28 तारखेला अजूनही तिथे एखादा प्राणी टांगलेला आहे. तर त्याला कीड लागते. मुंग्या लागतात. वास येतो. तसं तिथं काही झालेलं नाही. आत्ताही तुम्ही जाऊ तिथे पाहू शकता त्यामुळे एसआयटीचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Amol Mitkari: आर्थिक लालसेपोटी, राजकीय लालसेपोटी…..
माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पण जनता त्याच्यावर विश्वास आहे. त्या लोकांनी आर्थिक लालसेपोटी, राजकीय लालसेपोटी या गोष्टी केलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारा मी आहे, माझा विश्वास नाही आणि माझ्या नेत्याचाही विश्वास नव्हता. बारामती मध्ये हे प्रकार का घडवले ,कोणी केलं, कोणी हा धाक निर्माण केला, कशा पद्धतीने ते चक्र सगळं अंधश्रद्धेकडे गेलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी देखील तपासला पाहिजे. आमदार, मंत्री, संत्री, जर भोंदू बाबाचे भक्त असतील तर कायद्याचे इम्प्लिमेंट कसं होईल, कायद्याचे इम्प्लिमेंट करायला देखील तो माणूस विज्ञानवादी लागतो, रेडा मारणारा, बकरा कापणारा, अघोरी पूजा करणारा काही करू शकत नाही. माझा रोख हा जय अंधश्रद्धा म्हणतात त्यांच्याकडे आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत तुम्ही कधी अजितदादांच्या हातात हिरव्या खड्यांची, पाचूंची अशा बाबांनी भरलेली अशी एक तरी धागा दिसला का? त्यांच्या हातात कधी अंगठी नव्हती, मला अभिमान आहे, मी अजित दादांसारख्या नेत्याच्या हाताखाली दहा वर्ष काम केले आहे. जो नेता विज्ञानवादी होता, अंधश्रद्धा ज्या नेत्याला स्पर्श करू शकली नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Comments are closed.