CSK समोर MI चं लोटांगण; संतापलेल्या आकाश अंबानींनी मध्येच मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
MI vs CSK IPL 2026 आकाश अंबानी संतप्त व्हिडिओ : आयपीएल 2026 मध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे. गुरुवारी (23 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा तब्बल 103 धावांनी पराभव करत अक्षरशः धुव्वा उडवला. आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सला इतक्या मोठ्या फरकाने कधीच पराभव पत्करावा लागला नव्हता. आपल्या संघाची अशी नामुष्की होताना पाहून आकाश अंबानी यांना संताप आवरला नाही आणि त्यांनी सामना सुरू असतानाच स्टेडियम सोडून निघण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही, तर त्यांनी स्टेडियममधील चाहत्यांनाही घरी जाण्याचा इशाराही केल्याचं दिसून आलं.
मुंबई इंडियन्ससाठी सध्या काहीही बरोबर नाही. फक्त आकाश अंबानी खेळाच्या मध्यभागी चालत असताना पहा आणि तो डगआउटच्या अगदी समोरून चालला आणि त्याने खेळाडूंकडे पाहिलेही नाही. त्याने चाहत्यांना अक्षरशः स्टेडियम सोडण्यास सांगितले. एकतेचा अभाव म्हणजे… pic.twitter.com/8nplMjRYLN
— OldMonkOfCricket (@OldMonkOfCric) 24 एप्रिल 2026
संतापलेल्या अवस्थेत स्टेडियममधून बाहेर…
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की, सीएसकेविरुद्ध मुंबईचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरत असताना अंबानी हे दृश्य सहन करू शकले नाहीत. संघाची होत असलेली लाजिरवाणी कामगिरी पाहून त्यांनी सामना संपण्याआधीच वानखेडे स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला. ते इतके नाराज होते की जाताना त्यांनी वर पाहत चाहत्यांना देखील निघून जाण्याचा इशारा केला.
हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
2024 हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. गुरुवारी झालेल्या या सामन्यातील पराभवामुळे हार्दिकच्या कर्णधारपदावर मोठा डाग लागल्याचं बोललं जात आहे. आयपीएल इतिहासातील मुंबईचा हा सर्वात मोठा पराभव ठरला.
हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून रिपोर्ट कार्ड
हार्दिक पांड्याने 2024 पासून आतापर्यंत 35 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. यामध्ये संघाने केवळ 15 सामने जिंकले, तर तब्बल 20 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, 2013 ते 2023 या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. सध्या संघाच्या कामगिरीकडे पाहता, मुंबई इंडियन्ससमोर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.