गेम खेळताना Nude फोटोची मागणी, अश्लील मेसेज; अक्षय कुमारच्या 13 वर्षांच्या लेकीला आक्षेपार्ह मा

अक्षय कुमारच्या मुलीच्या अश्लील फोटोंची मागणी: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) मुलीकडे अश्लील संदेश पाठवत Nude फोटोची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने (Maharashtra Cyber Police) या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ऑनलाइन गेम खेळताना घडलेल्या या प्रकाराविषयी अभिनेता अक्षय कुमारने एका कार्यक्रमात त्याच्या मुली सोबत घडलेल्या या प्रकाराचा खुलासा केला होता.ऑनलाइन गेम खेळत असताना त्याच्या 13 वर्षाच्या मुलीकडे आक्षेपार्ह फोटो अश्लील मेसेज पाठवल्याचा त्याने सांगितलेलं. आता सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.

Nude फोटो अन् अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

अभिनेता अक्षय कुमार कायम आपलं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतो. अक्षयला दोन मुलं आहेत. आरव आणि नितारा. या दोघांनाही तो प्रसिद्धीझोतापासून कायम दूर ठेवतो. पण ऑनलाइन गेम खेळताना त्याच्या 13 वर्षांच्या मुलीकडे अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो मागितल्याचा प्रकार घडला. यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं व तपास सुरू केला. महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक झाल्याचे सांगितलं.

आधी विचारलं मुलगा की मुलगी अन् … अक्षय कुमारने सांगितलं ..

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजित सायबर जागरूकता महिना 2025च्या उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख केला होता. तो म्हणालेला ‘काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी घडलेल्या एका छोट्या घटनेबद्दल तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं आहे .माझी मुलगी व्हिडिओ गेम खेळत होती. असे काही व्हिडिओ गेम्स असतात जे तुम्ही खेळू शकता. पण हे गेम तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत खेळत असताना कधी कधी एक मेसेज येतो. एक असाच मेसेज आला होता जात विचारलं होतं ‘ तू मुलगा आहेस की मुलगी ‘ तिनं उत्तर दिलं ‘मुलगी ‘. मग त्यानं मेसेज पाठवला ‘ तू मला तुझे Nude फोटो पाठवू शकतेस का ? ‘ हे जिला विचारलं ती मुलगी माझी होती. तिने फोन ठेवला आणि माझ्या पत्नीला सांगितलं. आणि तिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली. हा सुद्धा सायबर गुन्हेगारीचा एक भाग आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रात सातवी, आठवी नववी आणि दहावीच्या वर्गांमध्ये दर आठवड्याला एक तास सायबर पिरेड म्हणून घेतला पाहिजे. इयत्ता 7 सायबर गुन्ह्यांविषयी मुलांना सजग केलं जावं अशी मागणीही अक्षय कुमारने केली होती.

आणखी वाचा

Comments are closed.