IPL 2026 – केएल राहुलची झुंजार खेळी व्यर्थ! श्रेयस अय्यर-प्रभसिमरनने डाव फिरवला, पंजाबचा विजयी षटकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील 265 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने 18.5 षटकांत 4 बाद 265 धावा केल्या आणि इतिहास रचला. श्रेयस अय्यरने अवघ्या 36 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावांची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 18 चेंडूत अर्धशतक झळकावत 18 व्या षटकापर्यंत 76 धावांची खेळी केली, तर प्रियांश आर्याने 43 धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनी श्रेयस अय्यरचे महत्त्वाचे झेल सोडल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.

याआधी फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 2 बाद 264 धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर के.एल. राहुलने 67 चेंडूत नाबाद 152 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली, ज्यात 16 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. त्याला नितीश राणाने 91 धावांची शानदार साथ दिली आणि दोघांमध्ये 220 धावांची विक्रमी भागीदारी झाली. मात्र, पंजाबच्या फलंदाजांनी हे कठीण लक्ष्य पार करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात लुंगी एनगिडीला क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झाल्यामुळे रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले, ज्यामुळे खेळाडू आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.