आंघोळीचा व्हिडीओ शूट करुन महिलेवर दीड वर्ष अत्याचार; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अटक

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तब्बल दीड वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश जगन्नाथ साठे हा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असून अकलूज पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Solapur Blackmail Crime : व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल

दीड वर्षांपूर्वी आरोपीने संबंधित महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ चोरून शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल केले.

Solapur Assault Case : दीड वर्षे अत्याचार

महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर सतत अत्याचार केले. या प्रकारामुळे महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. आरोपीच्या या कृत्याला कंटाळून अखेर महिलेने संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर दोघांनी अकलूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

Solapur Police Action : तातडीने अटक, तपास सुरू

पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Solapur Police Appeal : महिलांसाठी पोलिसांचे आवाहन

या घटनेनंतर सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महिलांना आवाहन केलं आहे की, अशा प्रकारचा त्रास होत असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांनी उपलब्ध करून दिलेला QR कोड स्कॅन करावा. पोलिसांकडून ओळख गुप्त ठेवून तातडीने कारवाई केली जाईल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.