IPL 2026 – सूर्यवंशीचं तुफानी शतकही फेल! अभिषेक–इशान चमकले; हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आणि 37 चेंडूंमध्ये 103 धावांची तडाखेबंद खेळी केली. 5 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस त्याने पाडला. वैभवचा आक्रमक पवित्रा आणि ध्रुव जुरेलची (51) दमदार खेळीमुळे राजस्थानने हैदराबादला जिंकण्यासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, वैभव सूर्यवंशीचं हे तुफानी शतक वाया गेलं. आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशन या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांची हवाच काढली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत खोऱ्याने धावा केल्या. अभिषेकने 57 आणि इशानने 74 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या क्लासेनन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी टॉप गिअरमध्येच आपली फलंदाजीला सुरुवात करत संघाचा विजय निश्चित केला. क्लासेनने 29 आणि नितीश कुमार रेड्डीने 18 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादने 229 धावांचे आव्हान 9 चेंडू बाकी ठेवत पूर्ण केले आणि 5 विकेटने सामना जिंकला.
Comments are closed.