भांडुपमध्ये ‘एम. के. घारे ज्वेलर्स’चे भव्य विस्तारित दालन सुरू
गेल्या 92 वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाचा वारसा जपणाऱ्या ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ यांनी भांडुप (पश्चिम) येथील एल.बी.एस. मार्गावर आपले नव्याने विस्तारित आणि आकर्षक दालन सुरू केले आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत या नव्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी अधिक प्रशस्त जागा आणि सोयीस्कर खरेदी अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या दालनात दैनंदिन वापरातील हलक्या दागिन्यांपासून ते लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या खास दागिन्यांपर्यंत, तसेच लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या विविध ज्वेलरी कलेक्शन्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. सोनं, चांदी आणि डायमंड ज्वेलरीच्या आकर्षक डिझाइन्समुळे हे दालन भांडुप परिसरातील ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह ‘वन-स्टॉप ज्वेलरी डेस्टिनेशन’ ठरत आहे.
1933 पासून शुद्धता, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवेसाठी ओळख असलेल्या या ब्रँडचे हे नवीन दालन त्या परंपरेला अधिक भव्य रूप देणारे ठरणार आहे. उद्घाटनानिमित्त मर्यादित कालावधीसाठी सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% पर्यंत सूट तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आहे. शॉप नं. 8 व 9, अनंत सिद्धी, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (पश्चिम). संपर्क : +91-9137028881
Comments are closed.