“मला तुझी सर्व सिक्रेट्स माहित असून जरा…,” वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चेवर ईशान किशनचा खुलासा

आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (२५ एप्रिल) जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराझर्स हैद्राबाद सामना रंगला. यामध्ये आरआरचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धावांचा पाऊस पाडला. त्याने ३७ चेंडूत पाच चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावा केल्या. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे आरआरने २० षटकात ६ विकेट्स गमावत २२८ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात एसआरएच्या अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी अर्धशतके केली आणि संघाला सलग चौथा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडली. या सामन्यानंतर वैभव आणि ईशान गप्पा मारताना दिसले.

वैभव आणि ईशान यांच्यात काय चर्चा झाली, हे समोर आले आहे. ईशान म्हणाला की, त्याला वैभवच्या प्रतिभेची जाणीव आहे आणि त्याची विकेट हे सामन्याचे चित्र पालटणारा क्षण ठरला, कारण जर तो शेवटपर्यंत खेळला असता तर आरआरने २५० धावांचा टप्पा पार केला असता.

“वैभवला आपल्या संघाविरुद्ध नरमाईने खेळण्याचा ईशारा दिला, कारण त्याला त्याची सर्व गुपिते आणि संघातील अंतर्गत गोष्टी माहित आहे”, असेही ईशानने पुढे सांगितले आहे.

“तो ज्याप्रकारे जबरदस्त फलंदाजी करतो, त्याबद्दलच मी त्याला सांगत होतो. कधीकधी तर, जर तो आणखी एक षटक खेळला असता तर धावफलक कसा दिसला असता, या विचारानेही भीती वाटते. त्यामुळे त्याची विकेट घेणे आमच्यासाठी महत्वाचे होते. धावसंख्या २२८ होती, ती सहज २५८ झाली असती”, असे ईशानने जियोहॉटस्टारच्या गुगल सर्च एआय मोड मॅच सेंटर लाइव्हमध्ये म्हटले आहे.

क्रिकट म्हणजे पुनरागमनच. आम्ही त्याला बाद केले आणि तिथे थोडे पुनरागमन केला. मी त्याला हेच सांगितले, जेव्हा मी तुझ्याविरुद्ध खेळत असेन, तेव्हा कृपया माझ्या संघावर थोडी द्या दाखव. मला तुमची सर्व गुपिते आणि आतल्या गोष्टी माहित आहेत, असेही ईशानने पुढे म्हटले आहे.

वैभवने एसआरएचविरुद्ध केवळ ३६ चेंडूत शतक पूर्ण केले. कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. तसेच पहिले शतकही त्यानेच केले होते. २०२५ च्या हंगामात त्याने ३५ चेंडूत १०० धावांचा टप्पा गाठला होता.

Comments are closed.