IPL 2026 – फिट असूनही मैदानात का उतरत नाही? स्वत: महेंद्र सिंग धोनीने सांगितलं कारण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे धोनी पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडला होता. मात्र, आता तो पूर्णपणे फिट झाला असून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. चेपॉक मैदानावर सराव सत्रात त्याने जोरदार घामही गाळला होता, परंतु तरीही तो प्रत्यक्ष सामन्यात खेळताना दिसला नाही.

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, फिट असूनही स्वतः धोनीनेच या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाचे ‘विनिंग कॉम्बिनेशन’. सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ विजयाच्या पटरीवर परतला आहे. गेल्या 4 पैकी 3 सामन्यांत संघाने विजय मिळवला असून, मुंबई इंडियन्सविरुद्ध 103 धावांनी मिळवलेला ऐतिहासिक विजय संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. धोनीला सध्याच्या संतुलित संघात कोणताही बदल करून संघाच्या विजयी ट्रॅकमध्ये अडथळा आणायचा नाहीये.

IPL 2026 – “वैभव सूर्यवंशी माझा नवा आवडता खेळाडू”; पॅट कमिन्सने केले तोंडभरून कौतुक, म्हणाला…

धोनीच्या अनुपस्थितीत संघात युवा खेळाडूंना संधी मिळत आहे. जर धोनी प्लेइंग-11 मध्ये परतला असता, तर कदाचित कार्तिक शर्माला बाहेर बसावे लागले असते. मात्र, संघाचे भविष्य आणि कार्तिकची कामगिरी लक्षात घेता, धोनी आणि संघ व्यवस्थापन त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. कार्तिक शर्माला चेन्नईने 14.2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. सध्या चेन्नई 6 गुणांसह आणि +0.118 च्या नेट रनरेटसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

Comments are closed.