मराठी सक्तीविरोधात संजय निरुपम इरेला पेटले, परिवहन मंत्र्यांना दुसरं पत्र, म्हणाले, बँका….

मराठी भाषेवर संजय निरुपम : स्थानिक भाषेत संवाद केलाf पाहिजे, परिवहन विभागाचा नियम असून 2019 च्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जात आहे. राज्यातील लोकांनी मराठीत संवाद (Marathi Language) केला पाहिजे, यावरुन मतभेद नाही किंवा वाद देखील नाही. तरतूद जीआरमध्ये अशी आहे की रिक्षा आणि आॅटो चालकांच्या मराठी ज्ञानाचे व्हेरिफिकेशन होईल, परीक्षा होईल आणि ते फेल झाले तर मग परमिट रद्द होईल. लायसन्स याची देखील जप्ती होईल. फक्त हा प्रस्ताव अन्यायकारक आहे. या संदर्भात परिवहन मंत्री यांना पत्र पाठवलंहे. अनेक जण मराठी बोलू शकतात, मात्र काही जण टेस्टमध्ये फेल झाले तर अडचण होईल. त्यांच्या उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होऊ शकतो. आॅटो चालकांनी बहुतेकांनी कर्ज घेतले आहे, जर परमिट रद्द झाला तर त्यांच्या समोर संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत सरकारमधील शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध दर्शवला आहे. परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या शाएसनाच्या (Marathi Language) निर्णयाविरोध करा त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. (ऑटो टॅक्सी चालकासाठी मराठी अनिवार्य)

Sanjay Nirupam: भाषा प्रेमाचा संवादाचा विषय, मात्र हंटर चालवून दबाव टाकत भाषा शिकली जात नाही

भाषा प्रेमाचा विषय आहेसंवादाचा विषय आहे. मात्र हंटर चालवून दबाव टाकत भाषा शिकली जात नाही. मुंबई राहणारे लोक हिंदीत बोलून काम चालवून घेतो. मात्र, मान-सन्मानसाठी आणि प्राचारासाठी आम्ही संकल्प घेतोय. किंवा कायदा, जीआर आणणार तर सगळ्यांना मराठी बाबत पुढाकार घेणार. असे असतानाकाॅर्पोरेट किंवा मोठ्या बॅंकांमध्ये काम करणाऱ्यांवर देखील हा निर्णय असला पाहिजे. असेही संजय संजय निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam : शासनासमोर आम्ही आमचं म्हणणं ठेवणार, आज विनंतीच दुसरं पत्र पाठवतोय

आगामी 1 ला महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्यात येणार आहे. या सक्तीसंदर्भात सरकारने पुनर्विचार करावा. आज यासंदर्भात बैठक आहे, शासनासमोर आम्ही आमचं म्हणणं ठेवणार आहोत. आज दुसरं पत्र पाठवतोय, विनंतीचा बेस समजून घ्या. भाषा शिकलीच पाहिजे, फक्त ही प्रक्रिया व्यक्ती व्यक्तीवर निर्भर असते. मंत्री महोदयांना निवेदन केले आहे ते, मूलभूत ट्रेनिंगचे काम सुरु झाले पाहिजे. शिबिर कॅम्प सुरु करण्याची तयारी आहे, असं मंत्र्यांनी सांगितलंहे. मराठी शिकण्याच्या प्रक्रियेत सर्वच सामील होईल. किमान 6 महिने ते एक वर्ष असा कालावधी ठरवावा, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही, असेही संजय निरुपम म्हणाले.

संजय निरुपम : अहो खरंयमराठी भाषिकांच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेना निर्माण झाली, पण

मराठी भाषिकांच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेना निर्माण झाली होती, हे बरोबर आहे. मात्र, हिंसा, मारामारी केली पाहिजे का? तर नाही. याच्या आम्ही विरोधात आहोत. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी काम केले. ही शिवसेनेचीच उपलब्धी आहे. जे बोंबाबोंब करतात त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. असेही संजय निरुपम म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.