मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्र

मुंबई टरबूज कुटुंब मृत्यू बातम्या: मुंबईतील पायधुनी परिसरात सोमवारी एकाच कुटुंबातील आई-वडील आणि लहान मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कलिंगड (Watermelon) खाल्ल्यानंतर झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) या सर्वांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही खात्री पटली नसून या सगळ्यांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली. मृत्यू झालेले डोकाडिया कुटुंब याच इमारतीमध्ये राहत होते. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृतांची नावे आहेत. (Mumbai Crime news)

डोकाडिया कुटुंबीयांच्या घरी रविवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी अब्दुल्ला डोकाडिया यांचे दोन्ही भाऊ आणि इतर नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. या सगळ्यांनी एकत्र जेवण केले. त्यांनी जेवणावेळी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर सर्व नातेवाईक घरी निघून गेले. परंतु, रात्री दीड वाजता डोकाडिया कुटुंबातील सर्वांनी एक कलिंगड खाल्ले. हे कलिंगड खाल्ल्यानंतर पहाटे चार-पाच वाजण्याच्या सुमारास लहान मुली आणि अब्दुल्ला व नसरीन यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. शेजाऱ्यांनी मदतीसाठी येत या सर्वांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, सोमवारी थोड्या थोड्या अंतराने लहान मुली आणि आई-वडील यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पायधुनी परिसरासह मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. कलिंगडातून झालेली विषबाधा हे डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे कलिंगडबाबत सामान्य नागरिकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे.

Watermelon: ते कलिंगड ऑनलाईन मागवलं?

डोकाडिया कुटुंबीयांनी जे कलिंगड खाल्लं होतं, ते नक्की कुठून आणलं होतं, याबद्दल नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. काहीजणांच्या मतानुसार डोकाडिया यांनी हे कलिंगड ऑनलाईन मागवले होते. हे कलिंगड आणून चार दिवस उलटून गेले होते. तर उर्वरित लोकांच्या म्हणण्यांनुसार ते नेहमी नळबाजार येथील मार्केटमधूनच फळांची खरेदी करायचे. परंतु, याबाबत ठोस माहिती नाही. डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये कलिंगडाविषयी दहशत पसरली आहे. या घटनेनंतर नळबाजार येथील फ्रूट मार्केटसह आजुबाजूच्या बाजारपेठेतून कलिंगडं गायब झाली. या घटनेमुळे स्थानिकांनी कलिंगडाचा धसका घेतला. या परिसरातील कलिंगडाची सर्व दुकाने बंद करायला सांगण्यात आले. पुढील काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय स्थानिक फळ विक्रेता असोसिएनशनने घेतल्याचे समजते.

आणखी वाचा

रात्री दीड वाजता कलिंगड खाल्लं, ॲसिड झरझर रक्तात भिनलं, घरात पाऊल टाकताच डॉक्टर कुरेशी हादरले, मुंबईच्या मुघल बिल्डिंगमध्ये काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.