क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, ‘तुम्ही कुठले?’ वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; ज

जळगाव क्राईम न्यूज : जळगाव (Jalgaon) शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. क्रिकेटचा सामना संपल्यानंतर झालेल्या या वादात धारदार शस्त्रांचा सपासप वापर करण्यात आला, ज्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेतले आहे.

Jalgaon Crime News: कसा संपला वाद?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मेहरूण तलाव परिसरात दोन गट समोरासमोर आले. यावेळी “तुम्ही कुठले?” या एका किरकोळ प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांनी एकमेकांवर चॉपर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांचे रक्ताच्या थारोळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Jalgaon Crime News: पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नातेवाईकांचा संताप

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विक्रांत राणे, मोहीत महाजन आणि निलेश सपकाळे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर आरोप केले जात आहेत. जखमी असलेला मोहीत महाजन याला उपचार मिळण्याऐवजी पोलिसांनी बराच वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Jalgaon Crime News: दुखापतीची प्रकृती चिंताजनक

पोलीस कोठडीत असतानाच मोहीतची प्रकृती अचानक खालावली. त्याला छातीत दुखू लागल्याने आणि उलट्या होऊन तो बेशुद्ध पडल्याने खळबळ माजली. मोहीतच्या छातीत चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते. त्याला सध्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील राहुल सोनवणे याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: तरूणीचे व्हिडीओ बनवले अन्….; परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा संशय, आरोपीचा मित्र फरार

Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.