विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता पक्षात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने कुणाला संधी द्यायची यावर पक्षात बैठक होऊन त्यात चर्चा होणार आहे. आता या एका जागेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या उपस्थित होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांवर चर्चा होणार असल्याची माहिती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी एकून 70 ते 75 जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे, याबाबती माहिती खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.(NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक आहेत असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. वरिष्ठ पातळीवर अजून निर्णय झालेला नाही. मात्र सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल असेही तटकरे यांनी म्हटलं आहे. अनेक इच्छुकांची पक्षाकडे मागणी आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रकोकण मुंबई वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रादेशिक भागातील जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच आहे, याबाबत वरिष्ठ पातळीवर  चर्चा होईल, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर बैठक होईल या संदर्भातील आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असेही सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलतान म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election : एका जागेसाठी रस्सीखेच

विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.

पक्षाच्या बैठकीत प्रामुख्याने या नावांवर चर्चा होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार

उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)

Vidhan Parishad Byelection 2026 : विधान परिषदेची पोटनिवडणूक

प्रज्ञा सातव

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.