शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घाला, संजय गायकवाडांचा अज्ञानपणा दूर होईना, पुस्तकाचं वाचन ऐकाय
बुलढाणा : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद राज्यभर पेटताना दिसत आहे. या प्रकरणात बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी दि. २८) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रकाशक प्रशांत आंबी यांचाही सहभाग असणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. आज होणाऱ्या या पुस्तक वाचनाला ते हजेरी लावणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. (Sanjay Gaikwad)
Sanjay Gaikwad: आम्ही त्या पुस्तक वाचनाला जाणार आहे
संजय गायकवाड बोलताना म्हणाले, पोलिसांनी सांगितलेल्या कायद्याचा सन्मान आम्ही केला. आमचा कार्यक्रम रद्द केला, त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या नावाखाली, परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता जाणून बुजून जे पुस्तक छापलं, त्याच्या 20 लाख प्रति विकल्या, त्यानंतर आता इथे येऊन पुस्तक वाचण्याची आवश्यकता काय आहे. आम्ही त्या पुस्तक वाचनाला जाणार आहे, आम्ही ते जाऊन पुस्तक ऐकणार, आम्ही खाली तिथे समोर जाऊन बसणार, विनयशिलतेने तिथे बसून आम्ही सगळ्या गोष्टी ऐकणार, आणि त्यामध्ये जर पुस्तक वाचताना त्यांनी शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार, पण जर एकेरी भाषेत महाराजांच्या नावाचा उल्लेख करत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला, तर मग मात्र शिवभक्तांच्या भावांना अनावर झाल्या, तर याची सगळी जबाबदारी त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाची आणि पुस्तक वाचणाऱ्याची असेल, अंसेही पुढे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. (Sanjay Gaikwad)
Sanjay Gaikwad: आमची कुठली त्या दहशत नाही
गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा या मागणीवरती बोलताना संजय गायकवाड म्हणाले, अशी कुठलीही मागणी मी केलेली नाही, लेखी देखील केली नाही आणि कोणत्याही मीडियावर देखील अशी मी मागणी केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर आज होणाऱ्या पुस्तक वाचणाच्या मोर्चासाठी उभारण्यात आलेला मंडप आमदाराच्या दहशतीने काढून टाकण्यात आला या आंदोलकांच्या आरोपावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आमची कुठली त्या दहशत नाही. एखादा कोल्हापूरचा कोणी लांडगा इकडे येईल, इकडे येऊन कुई, कुई करेल, आमच्या गावात आग लावेल, विनाकारण कायदा सुव्यवस्था निर्माण करेल, असं त्या मंडप चालकाला वाटलं, इथे देखील माझ्या मंडपामध्ये शिवरायांचे अपमान होणार म्हणून त्याने तो मंडप काढू नेला, त्याला सांगायची काय गरज आहे, असं गायकवाड म्हणालेत.
Sanjay Gaikwad: प्रशांत आंबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत गायकवाड म्हणाले….
मागील तीन अधिवेशनामधील माझी भाषणे आहे का? मी मागणी केली होती की, शिवाजी असं नाव असलेल्या संस्थानी आणि बाकी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असं नाव करावं, राज्यामध्ये कोणत्याही संस्थेला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं, अशी मीच नाही तर अनेक आमदार आम्ही मागणी केली आहे, असंही यावेळी बोलताना गायकवाड म्हणालेत. तर प्रशांत आंबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत गायकवाड म्हणाले, आमच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, महाराष्ट्रातील सर्व लोकांचा, शिवभक्तांचा अपमान झालेला आहे, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे, त्यांच्यावरती भावना भडकवल्याचा 505 ब गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अशी आमची मागणी आहे, असंही गायकवाडांनी म्हटलंय.
आम्ही त्यांच्या मंडपात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार आहोत, मी स्वतः तिथे जाणार आहे, मी, सर्व शिवभक्त, आम्ही सर्वजण तिथे जाणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Sanjay Gaikwad: मला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा देखील मेसेज मिळाला
शिवीगाळ आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणावर बोलताना गायकवाड म्हणाले, पहिल्या दिवशीच्या माझ्या काही रिएक्शन आल्या होत्या, रात्री साडेबारा वाजता, ते मी घरी रात्री पुस्तक पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझी फॅमिली होती. मी त्या नंतर रागात आलो, अत्यंत रागात होतो, कारण मी शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. त्या रागापोटी मी त्याला शिवीगाळ केली. मी ते शब्द मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी केस दाखल केली, आता हे नाटक करण्याची आवश्यकता काय आहे, आता हा तमाशा करायची गरज काय आहे, या सर्व विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होत आहे, मला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा देखील मेसेज मिळाला, या पुस्तकाला चाळीस वर्षे झाले आहेत, सरकारमध्ये काम करताना मी पाहिलं अनेक कायदे बदलले आहेत, अनेक पुस्तकांचे धडे बदललेले आहेत, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला, सरकारने देखील अशा पुस्तकांवर बंदी घालायला पाहिजे, त्या पुस्तकासाठी आरएनआयची परवानगी आहे का, जिल्हाधिकाऱ्यांची त्याच्याकडे परवानगी आहे का, वीस लाख प्रति विकल्या त्याचा काही हिशोब आहे का, कशाच्या आधारावर हे लेखक प्रकाशक बनतात, आणि अशाप्रकारे महाराजांचा खोटा इतिहास लिहितात, त्याच्याकडे मान्यता काय आहे, असे सवालही गायकवाडांनी उपस्थित केले आहेत.
पुस्तकवाचनावेळी जर त्यांनी महाराजांचा योग्य सन्मान केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांच्या स्वागत करू, त्यांनी त्या पुस्तकात 300-400 वेळा शिवाजी, शिवाजी असे लिहिले आहे, त्यांनी वाचनावेळी प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज म्हणावं, त्या पुस्तकात एका ठिकाणी तर त्यांनी औरंगजेब बादशाह म्हटलं आहे तर दुसरीकडे त्यांनी एकेरी भाषेत फक्त शिवाजी म्हणलं आहे, एकीकडे हे बादशहाला रिस्पेक्ट करतात पण आमच्या राजाला रिस्पेक्ट करत नाहीत, असं म्हणत संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षांनी माझ्यावर टीका केली, त्यांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही, पण एकीकडे माझा एखादा शब्द चुकीचा निघाला तर टीका करतात, पण महाराजांचं अपमान होतो, त्यावर बोला ना, ज्या ज्या लोकांनी टीका केली त्यांची तोंड त्याबद्दल काही शिवली होती का?, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा काही संबंध नाही का?, महाराज तुम्हाला मान्य नाहीत का?, तुम्ही बोलत का नाही?, बाकी सगळ्या गोष्टी संपल्या, गुन्हा दाखल करणे वगैरे, आता फक्त शिवाजी महाराजांचा पार्ट राहिला. बाकीचे बोलत का नाही असेही पुढे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील जनतेचे माफी मागितली, त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, मी शिवी दिली. माफी मी मागायची, त्यांचा काय संबंध आहे.
रोहित पवारांच्या भूमिकेवर संजय गायकवाड म्हणाले, ते सध्या महाराष्ट्रात हिरो बनायला चाललेले आहेत, त्यांना वाटते आपण अजितदादांची जागा घेतली पाहिजे, अजितदादांची जागा घेण्याकरता ते अजित दादांना न्याय देण्याचा खोटा आव आणत आहेत, दादांच्या अपघाताची सीआयडी आणि बाकी यंत्रणा चौकशी करत आहे, कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक केलं, अजित दादांच्या अपघाताची चौकशी होत आहे, दादा सगळ्यांना प्रिय आहेत, पण दादा होते, तेव्हा त्यांना विरोध करणारा, टीका करणारा, शेलक्या भाषेत बोलणारा, रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता, जेव्हा अजित दादा जिवंत होते, आता दादा गेल्यावर दादांची जागा मिळवाचा प्रयत्न आहे, असं म्हणत संजय गायकवाडांनी रोहित पवारांवर हल्लाबोक केला आहे.
Comments are closed.