Mumbai News – मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन; 5 कोटींची मागणी
मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी पहाटे धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख इरफान अशी सांगितली. फोन करणाऱ्याने सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून देण्यास सांगत 5 कोटी रुपयांची मागणी केली. आपली मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वे, लष्करी कार्यालये आणि नामांकित हॉटेल्स उडवून देण्याची धमकी दिली.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. या धमकीनंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
Comments are closed.