मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे ‘फुड पॉयझनिंग’ची शक्यता; आयुर्वेद तज्

मुंबई : नवी मुंबईत बिर्याणीसोबत कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे लोकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, या घटनेमागे ‘फूड पॉइझनिंग’ची शक्यता असल्याचा अंदाज आयुर्वेदातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. एकतर खाण्यात आलेल्या बिर्याणीमधून किंवा कलिंगडामधून ही विषबाधा (Mumbai Family death Watermelon) झाली असावी, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. कलिंगड आणि बिर्याणीसोबत खाल्ल्यामुळे असा कोणताही धोका नसल्याचं तज्ञ सांगतायेत. अकोल्यातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ  साधना कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना या घटनेमागे  ‘फुड पॉयझनिंग’ची शक्यता वक्त केली आहे. (Mumbai Family death Watermelon)

Mumbai crime news: बिर्याणीमधून किंवा कलिंगडामधून ही विषबाधा झाली असावी

या घटनेमागे ‘फूड पॉइझनिंग’ची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर एकतर खाण्यात आलेल्या बिर्याणीमधून किंवा कलिंगडामधून ही विषबाधा झाली असावी. कलिंगड आणि बिर्याणी सोबत खाल्ल्यामुळे असा कोणताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.(Mumbai Family death Watermelon)

बिर्याणी आणि कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चार लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमागे ‘फूड पॉइझनिंग’ची शक्यता असल्याचा अंदाज आहे. कारण आता उन्हाळा आहे, प्रचंड उष्णता आहे, त्याचबरोबर त्यांनी बिर्याणी खाल्ली त्यातील नॉन व्हेज शिजलं होतं की नाही, त्याचबरोबर कलिंगड चिरून काही वेळ ठेवलं तर ते थोड्या वेळात डिकंपोज व्हायला लागतं, त्यावरती फंगस तयार होते, ते जर त्यांच्या पोटात गेलं असेल तर हा एक पॉइजनिंगचा प्रकार आहे असं मला वाटतं आणि हे पॉइजनिंग जबरदस्त झालं असल्यामुळे त्यामुळे चारही लोकांचा मृत्यू झाला असेल. (Mumbai Family death Watermelon)

आयुर्वेदात विरुद्ध आहाराचे अनेक रेफरन्स आहेत. 18 विरुद्ध आहार आपल्याला सांगितले आहेत, पण नॉर्मली आपण विरुद्ध आहार करतच असतो, नकळतपणे ते आपण वारंवार करत असतो, पण त्वरित मृत्यू येणं आयुर्वेदात सांगितलेल्या विरुद्ध आहारामुळे होत नाही. त्यांनी जे पदार्थ खाल्ले त्यामध्ये खरोखर विष निर्माण झाले असेल, त्यामुळे त्या चौघांचा मृत्यू झाला, बिर्याणीमध्ये वापरलेल्या नॉनव्हेजमध्ये देखील काही विषय असू शकतं त्यामुळे देखील हा मृत्यू झालेला असू शकतो, असंही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Mumbai crime news: नक्की काय घडलं?

या संपूर्ण घटनेबाबत डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या इमारतीमधील एका डॉ. कुरेशी यांनी ‘एबीपी माझा’ला माहिती दिली. रात्री दीडच्या सुमारास या कुटुंबातील आई-वडील आणि लहान मुलींनी कलिंगड खाल्ले. यानंतर सकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यावेळी डोकाडिया यांच्या शेजाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या कुरेशी डॉक्टरांना बोलावून घेतले. ते डोकाडिया कुटुंबीयांच्या घरात पोहोचले तेव्हा चौघेजण बेशुद्ध पडले होते. त्यांनी संपूर्ण घरात उलटी केली होती. मी डोकाडिया यांच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळेजण बेशुद्ध अवस्थेत होते. लहान मुलीची नसही सुरु नव्हती. मी या सगळ्यांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली. यानंतर लहान मुलीला साबु सिद्दिकी रुग्णालयात नेले तर तिच्या आई-वडिलांना जे.जे. रुग्णालयात नेले. त्याठिकाणी नवऱ्याचा रक्तदाब कमी झाला, मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान नवरा बायको आणि मुलींचा मृत्यू झाला, असे डॉ. कुरेशे यांनी सांगितले.

मी या सगळ्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की, त्यांची तब्येत झपाट्याने बिघडत गेली. त्यांच्या रक्तात अॅसिड तयार झाले होते. प्राथमिक तपासणीतून त्यांनी रात्री दीड वाजता कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली. हा सगळा प्रकार कशामुळे झाला हे पोलीसच सांगू शकतील. पण आम्हाला जो संशय आहे, तो कलिंगडावरच आहे, असे डॉ. कुरेशी यांनी सांगितले होते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.