बुधवार पेठेत 3 बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेत अनधिपृतपणे वास्तव्य करणाऱया तीन बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला मागील एक महिन्यापासून उदरनिर्वाह चालवण्यासाठी मध्यवर्ती बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले आहे. कुंटणखान्यासाठी वापरलेले 4 फ्लॅट सील करण्यात आले आहेत. जोशना शपुर अली, पुलसुम खातून, अंजुरा बेगम अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशी महिला/ पुरुषांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त पृषिकेश रावले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या माहितीनुसार बुधवार पेठेत 3 बांग्लादेशी महिला अनाधिपृत विनापरवाना हिंदुस्थानात वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनपुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त पृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, उपनिरीक्षक पूजा जाधव, शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसिम शेख, वनिता कांबळे, वैशाली चौगुले यांनी केली.

चार फ्लॅट एक वर्षासाठी सील

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरात न्यु वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुना वाडा इमारतीतील फ्लॅट सिल केला आहे. त्यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पोक्सो अॅक्ट कलम 4, 17 अन्वये गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्हय़ामध्ये कुंटणखाना चालविणाऱयासह जागा उपलब्ध करून देणाऱ्याविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच पुंटणखान्यासाठी वापरलले फ्लॅट सिल करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पाठविला होता. त्यानुसार न्यु वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुना वाडा असे चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद केले आहेत.

Comments are closed.