ब्राझीलमध्ये शकीराच्या कॉन्सर्टच्या पूर्वतयारीदरम्यान दुर्घटना; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या कॉन्सर्टच्या तयारीला भीषण अपघातामुळे गालबोट लागले आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार शकीराच्या आगामी शोसाठी स्टेज उभारणीचे काम सुरू असताना रविवारी, 26 एप्रिल रोजी एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शकीराच्या चाहत्यांमध्ये आणि संगीत वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून, आगामी शोवरही दुःखाचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,’Todo Mundo no Rio’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी स्टेजच्या रचनेवर काम सुरू असताना हा अपघात झाला. कार्यक्रमाच्या आयोजकांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून इन्स्टाग्रामवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात कार्यक्रमासाठीची पूर्व तयारी सुरु असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

अपघातानंतर संबंधित कर्मचाऱ्याला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आयोजकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेमुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

शकिरानेही याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच शोच्या आयोजकांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी आर्थिक मदत आणि आधार देण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments are closed.