आमदार, खासदार आले म्हणून अधिकाऱ्यांनी उठून उभे राहण्याची गरज नाही, सरकारकडून आदेशात दुरुस्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आमदार किंवा खासदार भेटीसाठी आले तर त्यांना येताना आणि जाताना उठून उभे राहून अभिवादन करावे अशा आपल्याच आदेशात राज्य शासनाने आज दुरुस्ती केली. आमदार, खासदार आले म्हणून अधिकाऱयांनी उठून उभे राहण्याची गरज नाही. सामान्य नागरिकांना जशी वागणूक दिली जाते तशीच लोकप्रतिनिधींना द्यावी, अशी सूचना देणारा आदेश आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जारी केला.

आमदार किंवा खासदार कार्यालयात आले तर उठून उभे रहावे असे आदेश राज्य शासनाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व शासकीय अधिकाऱयांना दिले होते. तो आदेश आज शासनाने बदलून टाकला. एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास आणि त्याला चौकशी किंवा सुनावणीसाठी अपिलकार वा पक्षकार म्हणून बोलवण्यात आले असेल किंवा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने तो कार्यालयात उपस्थित राहिला असेल तर त्याला येताना आणि जाताना उभे राहून अभिवादन करण्याची आवश्यकता नाही.

अशा प्रसंगी कोणताही भेदभाव न करता अधिकाऱयांनी कायदा, नियम व परिस्थितीनुरूप सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींना वागणूक द्यावी, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.