भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले

भाजप संजय भेंडे विधान परिषद निवडणूक 2026: भाजप पक्ष संघटना, पक्षाच्या उमेदवारांसाठी पडद्यामागून अनेक निवडणूका लढवणारे, संघटनेचा खंदा कार्यकर्ता या भूमिकेतून पक्षासाठी अनेक निवडणुकींचा मायक्रो प्लॅनिंग करणारे संजय भेंडे (Sanjay Bhende) पहिल्यांदाच स्वतःसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने (BJP) मंगळवारी रात्री विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या (Vidhan Parishad Election 2026) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नागपूरच्या (Nagpur) संजय भेंडे यांचा समावेश आहे. संजय भेंडे हे भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. (Maharashtra Politics)

योग्य राजकीय वेळ आल्यावर पक्षाने संधी दिली म्हणून पक्षाचे आणि सर्व नेत्यांचे संजय भेंडे यांनी भाजपचे आभार मानले आहेत. आजवर पक्षासाठी विविध निवडणुकींसाठी संयोजन आणि नियोजन करताना बरेच अनुभव मिळाले. त्याच्यातून माझं राजकीय व्यक्तिमत्व घडलं, अशी प्रतिक्रिया संजय भेंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर दिली. मी जरी कुणबी समाजाचा असलो तरी भाजप सर्व जातींना सोबत घेऊन पुढे जात असते. देवेंद्र फडणवीस जातीने ब्राह्मण असले तरी ते ओबीसींचे नेते मानले जातात. त्यामुळे भाजपमध्ये जात पाहून संधी दिली जात नाही, असे संजय भेंडे यांनी सांगितले.

कोण आहेत संजय भेंडे? (Who is Sanjay Bhende)

* संजय भेंडे भाजपचे अनेक वर्षांपासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
* सध्या ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा स्तरापासून भाजपच्या संघटनेत अनेक पदं भूषविली आहेत.
* नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ते सलग तीन वेळेला नितीन गडकरी यांचे निवडणूक प्रमुख राहिले आहेत.
* नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही ते भाजपचे निवडणूक प्रमुख होते.
*  ते सहकार चळवळीत ही सक्रिय असून नागपूर नागरी सहकारी बँकेचे संचालक राहिले आहेत.

BJP News: विधानपरिषद उमेदवारांच्या निवडीत भाजपचं सोशल इंजिनिअरिंग

भाजपकडून विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांची निवड करताना सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. उमेदवार निवडीत प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. तीन ओबीसी, एक मराठा, एक अनुसूचित जाती तर खुल्या प्रवर्गालाही उमेदवार यादीत स्थान देण्याचा प्रयत्न. ऐनवेळी पक्षात आलेल्या आयारामांना नो एन्ट्री पण वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांचे सभागृहात इनकमिंग

सुनील कर्जतकर (खुला प्रवर्ग)
माधवी नाईक, मुंबई (SC)
संजय भेंडे, नागपूर (ओबीसी-कुणबी)
विवेक कोल्हे, अहिल्यानगर (मराठा)
प्रमोद जठार, कोकण (ओबीसी-वैश्यवाणी)
प्रज्ञा सातव (ओबीसी-माळी)

आणखी वाचा

Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?

आणखी वाचा

Comments are closed.