मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप

मुंबई ड्रग्ज प्रकरणी अमित शहा मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनसीबीने मुंबईत 349 किलोचं कोकेन पकडण्यात आलं आहे. या पकडलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1745 कोटी रूपये इतकी आहे. या कारवाईबाबत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्स पोस्ट करत घोषणा केली आहे. ‘बॉटम टू टॉप’ तपासाचं उत्तम उदाहरण, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. (NCB seized 349 kg narcotics in mumbai)

अमित शाह नेमकं काय म्हणाले? (Amit Shah On Mumbai Drugs Case)

अमली पदार्थांच्या टोळ्यांना (कार्टेलला) निर्दयपणे नेस्तनाबूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)ने अमली पदार्थांच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटवर कडक कारवाई करत, मुंबईमध्ये 1745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च-दर्जाचे कोकेन जप्त केले आहे. हे  ‘बॉटम टू टॉप’ तपासाचं उत्तम उदाहरण आहे. ज्यामध्ये या संस्थेने अंमली पदार्थांच्या एका लहान खेपेचा मागोवा घेत, एका प्रचंड मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला. या अभूतपूर्व यशाबद्दल ‘टीम NCB’ चे मनःपूर्वक अभिनंदन, अशी पोस्ट अमित शाह यांनी केली आहे.

ड्रग्ज टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय- (Drugs Case)

अमली पदार्थांचा सेवन करून मोकाट रस्त्यावर वाहनातून फिरणाऱ्यांची, पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन करून उशिरा रात्री घरी परतणाऱ्यांना आता रस्त्यावरच कायद्याचा चाप बसणार आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलिसांनी अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात आज महाराष्ट्र दिनापासून या अत्याधुनिक मशीनचे पोलिसांद्वारे रस्त्यावर वापर सुरू केले जात आहे. लवकरच नागपूरसह राज्यातील इतर सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावरच अमली पदार्थांच्या सेवन संदर्भात तपासणीच केली जाणार नाही तर लागलीच हातात अमली पदार्थाचा सेवन केल्यासंदर्भातला रिपोर्टही सोपवला जाणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Thane Crime News :कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक

आणखी वाचा

Comments are closed.