‘अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ’, खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणार

अशोक खरात नाशिक कोर्टात सुनावणी : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) खरातचा ताबा घेतल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Ashok Kharat Nashik Court Hearing: नेमके प्रकरण काय?

फिर्यादी राजेंद्र अशोक जासूद यांना त्यांचा लॉजिस्टिकचा व्यवसाय जगभर विस्तार करायचा होता. याचाच फायदा घेत अशोक खरातने त्यांना ‘अवतार पूजा’ करण्याचा सल्ला दिला. ही पूजा करण्यासाठी तीन देश फिरावे लागतील आणि ईशान्येश्वर मंदिरात पूजा करावी लागेल, असे खरातने सांगितले. पूजेदरम्यान जासूद यांना नकली साप दाखवून घाबरवण्यात आले. “जर ही पूजा केली नाही, तर तुझा मृत्यू अटळ आहे,” अशी भीती घालून खरातने जासूद यांच्याकडून तब्बल 5 कोटी रुपये उकळले.

अशोक खरात नाशिक कोर्ट सुनावणी: न्यायासाठी सरकारी वकिलांची खेळी

सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने फिर्यादीला मृत्यूची भीती घालून मोठी आर्थिक उलाढाल केली आहे. ईशान्येश्वर मंदिरात नेमकी कसली पूजा चालत होती? आणि या पैशांचा विनियोग कुठे झाला? याचा तपास करण्यासाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली.

Ashok Kharat Nashik Court Hearing:  आरोपीच्या वकिलांचा बचाव

दुसरीकडे, खरातच्या वकिलांनी सर्वात पहिला गुन्हा वावी पोलिसात नोंदविण्यात आला होता. दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात गुन्हा दाखल केला होता. 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अशोक खरात यांनी गुन्हा दाखल केला. सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादमध्ये वावीच्या गुन्हा बाबतीत कोणतीही माहिती नाही. यानंतर नीरज जाधव नावाचा माणुस पुढे आला. त्याने स्पाय कॅमरा लावून व्हिडीओ चित्रित केले. ते सर्व व्हिडीओ त्याने दिनेश परबला दिले. या प्रकरणी दिनेश परबला अंतरीम जामीन उच्च न्यायालयाने दिला. नीरज जाधव याला माफीचा साक्षीदार होण्याचे पोलिसांनी सांगितले. वावीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 महिन्यांनी जासूदला फसवणूक झाल्याचे जाणवले. पैशाचा व्यवहार झाला असे म्हणतात पण या घटनेला महिना उलटून गेला त्याचा तपास झाला असेल. सापाचा विषय आज काढला, तो याआधी ही चर्चेत आला आहे. हे तीन देश फिरले त्याचे फोटो दाखविले, ते आम्ही सहमतीने गेलो, एकत्र खर्च केला असा दावा जासूद ने याआधी बेल अप्लिकेशनमध्ये केला आहे. जी गाडी दिली ती गिफ्ट दिली आहे. या गुन्ह्याचा तपास वावी पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्यात आहे. त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.

Ashok Kharat Nashik Court Hearing:  खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात खरातने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातचा लुटीचा ‘रिंग’ मास्टर प्लॅन उघड, पाच हजारांची अंगठी लाखांना विकली; SIT कडून ‘त्या’ ऑफीसमधून अंगठीची मापे आणि धनादेश जप्त

आणखी वाचा

Comments are closed.