Video: देवेंद्र फडणवीसांकडून वाहतूक कोंडीतील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, नवं नाव..
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिसिंग लिंक' या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. तत्पूर्वी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचं त्यांनी म्हटलं. जे स्वप्न आम्ही मुंबई-पुणे प्रवास (एक्स्प्रेस वे ट्रॅफिक) करणाऱ्यांनी बघितलं होतं हे पूर्ण झालंय. सध्या प्रकल्पास ‘मिसिंग लिंक’ म्हटलं जातंय, पण या ला मिसिंग लिंक नाही तर ‘कनेक्टिटिंग लिंक’ नाव द्या, याला नाव जे द्यायचं ते ठरवणार आहोत. पण, गायकवाडजी तुम्ही ‘मिसिंग लिंक’ नाव बदला. कारण, नथिंग इज मिसिंग असे म्हणत फडणवीसांनी या प्रकल्पास ‘कनेक्टींग’ लिंक असं नवं नाव दिलंय. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल जनतेची माफी देखील मागितली.
महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मिसिंग लिंक पुलाच्या मजबुती आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी आलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचा वेग सुमारे 130 किमी प्रतितास होता, तर सद्यस्थितीत पुलाची रचना 240 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा केबल-स्टे पूल आंतरराष्ट्रीय इंजिनिअरींगचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पात एकूण सात देशांचा सहभाग होता. पुलाचे डिझाइन कॅनडामध्ये तयार करण्यात आले, तर काही महत्त्वाच्या चाचण्या डेन्मार्कमध्ये पार पडल्या. केबलचे उत्पादन मलेशियामध्ये झाले, अग्निशमन सुरक्षेच्या चाचण्या स्पेनने केल्या, पुलाचे आलेखन तैवानमध्ये करण्यात आले, आणि केबल तज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले होते.
24 तास सीसीटीव्ही, सुरक्षेला प्राधान्य (Missing link to connecting link)
पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 24 तास सीसीटीव्ही देखरेख, विशेष व्हेंटिलेशन प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच लेन शिस्त पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास चलान आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्य सरकार आणि परदेशी सल्लागार या दोघांनाही विविध अडथळे आले, मात्र सर्व अडचणींवर मात करत प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या कामासाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमचे फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, हा प्रकल्प अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरेल, असेही त्यांनी म्हटले. हा पूल केवळ वाहतूक सुलभ करणार नाही, तर मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये जागतिक दर्जाची भर घालणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी (Devendra Fadnavis mumbai pune traffic)
मला माफी मागायची आहे, आज मुंबई पुणे ‘एक्सप्रेस वे’वर ट्रॅफिक जाममध्ये अनेकजण अडकले, त्यांना त्रास सहन करावा लागला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागितली. तसेच, सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ आला, सुप्रियाताई आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहात, आत्ता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत. तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं, ते काम आमच्या सरकारने पूर्ण केलंय, असे म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोलाही लगावला. दरम्यान, आज कामगार दिनी मजुरांच्या श्रमामुळेच हे शक्य झालंय, आज धन्यवाद मानतो. त्यांच्या श्रमामुळे आज हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला, असेही फडणवीसांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.