अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल, 2 लाख 59 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाउन’ अंतर्गत सिंदखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करत तब्बल २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी किनवट मार्गावरील सारखणी ते सारखाणी घाट या रोडवर सिंदखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत असताना टाटा-एस वाहन क्र. एम. एच. २९ बी ई ४१४५ जात असताना संशय आल्यावरून त्यास थांबून तपासणी केली असता तपासणीदरम्यान वाहनामध्ये गोवंश जनावरांची अवैध व अमानुष पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी शेख सोहेल रा. किनवट, संतोष व्यंकटी मुंडे रा. नागझरी, किनवट आणि ईश्वर गुनाजी जुगनाके रा. अंजनी, पो. स्टे. दत्तमांजरी , ता. माहूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक टाटा एस वाहन अंदाजे किंमत २ लाख रुपये, दोन बैल (२२ हजार रुपये), एक काळा-गोरा रंगाचा गाय (१० हजार रुपये), एक पांढरा-गाय (१५ हजार रुपये) व एक पांढरा-राखी रंगाचची गाय, १२ हजार रुपये असा २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

Comments are closed.