Mumbai:…तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा नगरसेवकांना सज्जड दम
मुंबई भाजप बातम्या: मुंबई भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षशिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार केला जाईल, असा सज्जड शक्ती वजा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेतील अनुपस्थितीवरून मुंबई भाजप (BJP News) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांni भाजप नगरसेवकांना या संदर्भात थेट इशारा दिला आहे. महत्त्वाच्या प्रस्तावावेळी नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. यापुढे सभागृहाच्या कामकाजात कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असेही अमित साटम म्हणाले.
Ameet Satam : मुंबईकरांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडू नका
मुंबईकरांनी आपल्याला मोठ्या अपेक्षेने निवडून दिले आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडू नका. असे सांगत अमित साटम यांच्याकडून नगरसेवकांची कानउघाडणी करण्यात आली आहे. ऑनलाइन बैठकीद्वारे मुंबई अध्यक्षांनी नगरसेवकांचा क्लास घेतालाहे. दरम्यान याच मुद्दयांवर बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या तेनगरसेवकांनी उपस्थित राहणे गरजेचं आहे. पक्षाने नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. व्हीप बजावला असता का आले नाहीत? याबद्दल विचारणा केली आहे. विरोधकांना वाटत असेल की एक प्रस्ताव नामंजूर झाला म्हणजे सर्व झालं. पण आणखी पुढे खूप काही आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. असेही त्या म्हणाल्या
मुंबई नालेसफाईची पाहणी आजपासून सुरु केली आहे. अर्थसंकल्प सुरु होता, त्यानंतर महाराष्ट्र दिन त्यामुळं आजपासून नालेसफाई सुरु केली आहे. महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे कोणी बसून काम करणार नाही, तर ग्राउंडवर उतरून काम करतील. माहुल नाल्यापासून सफाईची पाहणी सुरु केली. कारण सर्वात कमी काम या नाल्याच झालं आहे. जास्तीत जास्त काम कसं होईल, यावर भर दिला जात आहे. इथे आल्यावर एक गोष्ट जाणवली की कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी cctv लावलेले नाहीत, ते लावण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच त्या cctv ची लिंक स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी, असं सांगितलं आहे. प्रत्येकी 30 सेकंदाचे वीडियो देखील काढायला सांगितले आहेत, असेही महापौर रितू तावडे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.