राज्यात दिवसाला 24 अत्याचार, तासाला एक, रोहित पवारांनी मांडली हादरवणारी आकडेवारी; भोर तालुक्यात
पुणे मॉर्निंग क्राईम न्यूजवर रोहित पवार: पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिला संपवण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे आज नसरापूर गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी घटनेबद्दल संताप व्यक्त करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केलीय.
रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, काल जो लोकांचा आक्रोश पाहायला मिळाला, तो योग्यच होता. अशी एखादी घटना घडत असेल तर लोक चिडणारच आहेत. काल एसपी साहेबांशी सुप्रिया ताईंनी चर्चा केली. मी आज एसपी साहेबांशी बोललो. हा क्रिमिनल दोन वेळेस अशाच प्रकारच्या घटनेत पकडला गेला होता पण बेलवर तो बाहेर आला. तिसरी घटना करण्याचे त्याचे धाडस झालेच कसे? उद्या जर हा परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर या कायद्याचे करायचे काय? अशी येथील लोकांची भावना आहे. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर लोकांनी मान्य केले आहे.
Rohit Pawar on Pune Bhor Crime news: पीडित मुलीच्या आईला आर्थिक मदत द्या
1983 मध्ये सुप्रीम कोर्टचा एक निकाल आहे. ज्यात कॅपिटल पनिशमेंट म्हणजे क्रिमिनलचा मृत्यू झाला पाहिजे, अशी मागणी सरकारने केली होती. तसेच, या घटनेमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसात मिळू शकते. लोकांची आणखी एक भूमिका आहे की, मुलीच्या आईला आर्थिक मदत सरकारकडून मिळाली पाहिजे. त्या महिलेला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या येथील लोकांनी केलेल्या आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar on Pune Bhor Crime news: राज्यात दिवसाला 24 अत्याचार
मुख्यमंत्र्यांनी लोकांची फास्टट्रॅक कोर्टाची मागणी मान्य केली, असे मला समजले. एसपी साहेब म्हणाले पंधरा दिवसात चार्ज शीट दाखल केली जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल. मंगळवारी येथील काही लोक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या राज्यात एप्रिल 2026 मध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बीडमध्ये अत्याचार झाला. जानेवारी 2026 मध्ये बदलापूरची घटना घडली. एप्रिल 2026 मध्ये बारामतीत एका दहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाले. राज्यात दिवसाला 24 अत्याचार घडत आहेत. म्हणजे तासाला एक घटना घडत आहे. दरवर्षी 50 हजार महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Rohit Pawar on Pune Bhor Crime news: महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू झाला पाहिजे
महाविकास आघाडीच्या काळात लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता. शक्ती कायदा आणल्यानंतर तो मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. पण, केंद्र सरकारने तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला. त्यांना त्याचे नाव उचित वाटले नाही आणि त्याचा नंबर योग्य वाटत नाही, असे आम्हाला समजले. त्या कायद्यात कडक कारवाई करण्याबाबत आपल्या सरकारने सांगितले होते. त्यात 21 दिवसात निकाल लागला पाहिजे, तसेच ऑनलाईन कलमांबाबत काही कडक गोष्टी करण्यात आल्या होत्या. मात्र इतक्या कडक गोष्टी केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का? अशी शंका केंद्र सरकारने व्यक्त केली. त्यामुळे तो कायदा पुन्हा एकदा महाराष्ट्रात आला. सर्वात पहिले शक्ती कायदा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात विशेष अधिवेशन घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.