दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम स्थळावर मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम स्थळावर मोठी दुर्घटना घडली आहे. एल अँड टी (L&T) कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी अवजड क्रेन अचानक कोसळल्याने दोन कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य काही कामगार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील बांधकाम स्थळावर क्रेनच्या साहाय्याने काम सुरू होते. यावेळी क्रेनचा तोल बिघडल्याने ती थेट कामगारांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात रघुनाथ दास (३८) आणि काना सिंग (४५) या दोन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले.

घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, दहिसर-भाईंदर लिंक रोड हा मुंबई आणि भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र इतक्या मोठ्या स्तरावर काम सुरू असताना सुरक्षिततेचे निकष पाळले जात होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Comments are closed.