संपत्तीच्या वाद जीवावर उठला! दीरानेच भावजयसह पुतण्या आणि पुतणीचा काढला काटा
सोलापूर क्राईम न्यूज : धक्कादायक घटनेनं आज सोलापूर जिल्हा हादरला आहे. संपत्तीच्या वादातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आई, मुलगी आणि मुलाची एकाच वेळी हत्या झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संपत्तीच्या वादातून दिरानेच सख्खी भावजय आणि पुतण्या-पुतणीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गायत्री सुधाकर मस्के वय 40, मुलगी प्रिया मस्के वय 18 आणि मुलगा शिवराज मस्के वय 16 असे हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरण समोर आलं आहे. संपत्तीच्या वादातून दिरानेच भावजय आणि पुतण्या-पुतणीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत हत्या झालेल्या गायत्री मस्के यांचे पती सुधाकर मस्के यांचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही महिण्यापासून गायत्री मस्के आणि दीर शंकर उर्फ पप्पू मस्के यांच्यात संपत्तीवरुन वाद सुरु होते. याचं वादातून शंकर उर्फ पप्पू याने भावजय गायत्री, पुतण्या शिवराज आणि पुतणी प्रिया हिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कुटुंबाची हत्या झाल्यापासून शंकर उर्फ पप्पू मस्के हा गायब आहे, त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान मृत प्रिया मस्के ही बारवीच्या वर्गात शिकत होती, आजच तीने दिलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे. बारावी सायन्स शाखेतून प्रिया मस्के हिला 68.83 टक्के गुण मिळाले आहेत. आपल्या परीक्षेच्या निकाल पाहण्यापूर्वी प्रिया हिची क्रूर हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर मृत शिवराज मस्के हा देखील याच वर्षी दहावी CBSE परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला 61.82 टक्के गुण मिळाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आी आहे.
7 एकर शेतीच्या वाटणीवरून मागील काही महिन्यापासून वाद सुरु
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शंकर दत्तात्रय मस्के, सुधाकर दत्तात्रय मस्के आणि प्रदीप दत्तात्रय मस्के या तिघे भाऊ होते.. गेल्या पाच वर्षापूर्वी सुधाकर मस्के यांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या तीन वर्षापूर्वी प्रदीप यांचा मृत्यू झाला होता. या तिघांसाठी वडिलांनी जवळपास 15 वर्षांपूर्वी तिघांसाठी तीन स्वतंत्र बंगले बांधले होते. 7 एकर शेती तिन्ही भावंडत होती. या शेतीच्या वाटणीवरून मागील काही महिन्यापासून वाद सुरु होते. याचं संपत्तीवरून शंकर याने आपल्या सख्या भावजयसह पुतण्या-पुतणीची हत्या केली आहे.
मध्यरात्री बाराच्या सुमारास केली हत्या
मध्यरात्री बाराच्या सुमारास शंकरने आपली भावजयसह पुतण्या आणि पुतणीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह घराच्या गच्चीवर तर शिवराज याचा मृतदेह हा बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून या घटनेच्या संदर्भाने तातडीने तपास सुरु करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.