दक्षिण रायगडातील २५ गावांच्या वेशींवर डौलाने फडकला; भगवा महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेनेचा भगवा उपक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाड विधानसभा मतदारसंघातील २५ गावांच्या वेशींवर भगवा झेंडा डौलाने फडकला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त या उपक्रमाचा प्रारंभकरण्यात आला. जिल्ह्यातील एक हजार गावात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून महाड विधानसभा मतदारसंघातील देवपूर, गांजवणे, खडपी, मोरगिरी, ओंबळी यांसह पोलादपूर तालुक्यातील | २५ गावांच्या वेशींवर ध्वजस्तंभाची उभारणी करून त्यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याच हस्ते पहिला भगवा ध्वज फडकवण्यात आला. या भगव्या उपक्रमांतर्गत शिवसैनिक गावागावात पोहोचून जनतेशी संवाद साधतील, असे संजय कदम यांनी यावेळी सांगितले. जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, उपजिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे, मुरलीधर दरेकर, पोलादपूरचे उपतालुकाप्रमुख डॉ. चेतन गिरासे, चंद्रकांत यादव, राजेश जाधव, गणेश कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.