बिरार नाही विरार म्हणा भाऊ; शिवसेनेचे अमराठी रिक्षाचालकांना मराठीचे धडे
महाराष्ट्रदिन व कामगार दिनानिमित्त शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना लाडू वाटून त्यांचे तोंड गोड केले. जे परप्रांतीय रिक्षाचालक विरारचा उल्लेख ‘बिरार’ असे करतात त्यांना ‘बिरार’ नाही भाऊ ‘विरार’ म्हणा, गरजेपुरती तरी मराठी शिका, स्पष्ट मराठी बोला अशा सूचना करतानाच प्रवाशांनाही तुम्ही रिक्षाचालकांशी मराठीतच बोला, असा आग्रहही शिवसैनिकांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्व अमराठी रिक्षाचालकांना मराठीत बोला, बोलता येत नसेल तर शिवसेना मराठीचे शिकवणी वर्ग घेईल, असे विरार शहर शाखेच्या वतीने शहरप्रमुख उदय जाधव यांनी जाहीर केले होते. महाराष्ट्र दिनानिमित्त उदय जाधव यांच्यासह शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे यांच्या उपस्थितीत
महाराष्ट्र दिनानिमित्त लाडू वाटून तोंड गोड केले
कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अॅड. गिरीश दिवाणजी, नीलेश कानकाटे, उपशहरप्रमुख महेंद्र सकपाळ, गिरीश राऊळ, तुकाराम भुवड, महिला उपशहर संघटक रोशनी जाधव, विभाग संघटक सुनीता सोनजे, साक्षी जाधव,
गर्जा महाराष्ट्र
प्रीतम रावराणे, विनायक पाडावे, उपशाखप्रमुख संदीप तरळ, भावेश बाईत, भगवान दाबेकर, उपविभाग अधिकारी मंदार परब, गिरीश गुरव आदी शिवसैनिक उपस्थित होते. ‘बिरार’ नाही ‘विरार’ म्हणा.., बैठो नाही बसा म्हणा.., कहाँ जाना है नाही कुठे जायचे आहे म्हणा.. असे मराठीचे धडे शिवसैनिकांनी अमराठी रिक्षाचालकांना दिले. लाडू खा, तोंड गोड करा आणि महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदा.. असे शहरप्रमुख उदय जाधव यांनी या रिक्षाचालकांना सांगितले.
Comments are closed.