आधी अत्याचार केला, नंतर मुलीचे अश्लील फोटो अन् व्हिडीओ तिच्या आईला पाठवले; अमरावतीतील प्रकार
अमरावती : जिल्ह्यातील वरूडच्या बेनोडामध्ये परतवाड्यासारखा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 22 वर्षीय आरोपीनं एका मुलीवर अत्याचार केला. नंतर वाद झाल्यानंतर त्या मुलीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून तिच्या आई आणि आजीला पाठवल्याची घटना घडली. बेनोडे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाबू हसन असं आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित मुलगी आणि आरोपीची दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दरम्यान पिडीतने स्वतःचे काही फोटो आरोपी यास पाठविले होते. 5 जानेवारीला आरोपी नागपुरात मुलीला भेटण्यासाठी आला. तेव्हा मुलीची इच्छा नसताना आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला.
काही दिवसानंतर पीडित मुलगी आणि आरोपीमध्ये वाद झाला आणि पीडितेनं आरोपीचा नंबर ब्लॉक केला. याच रागातून आरोपीनं त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या आई आणि आजीला पाठवले. तसेच ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
घडलेल्या प्रकारानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यता आला. नंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपीचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात
आरोपीकडून दोन मोबाईल फोन तसेच पीडितेच्या आजीचा एक मोबाईल फोन गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये पीडित मुलीचा फोटो तसेच आरोपी तिचा मुका घेत असलेला फोटो मिळाला आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतेही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हीडीओ मिळालेले नाहीत. तरीही सर्व मोबाईल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67(A) वाढविण्यात आले आहे. या घटने संदर्भात पोलिस प्रशासनाने आरोपी विरुद्ध कठोर कलमान्वये गुन्हा नोंद करून तात्काळ अटक केलेली असून कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलिस दलाकडून करण्यात येत आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.