नागपुरात नायब तहसीलदाराने जीवन संपवलं; वानाडोंगरीतील घरात गळ्याला दोर लावला
नागपूर गुन्हे: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून वानाडोंगरी परिसरातील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहणाऱ्या एका नायब तहसीलदाराने गळफास घेत जीवन संपवलं आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव वैभव रामेश्वर राठोड (वय 42) असे असून ते मौदा तालुक्यात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते.
Nagpur Nayab Tahsildar Incident Details : घरात एकटं असताना टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने वैभव राठोड हे घरीच होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. सायंकाळी त्यांच्या बहिणीने घरी येऊन दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फोन कॉललाही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना बोलावण्यात आले.
Nagpur Police Action : पोलिसांनी दरवाजा उघडला, मृतदेह सापडला
यानंतर पोलीसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता, बेडरूममध्ये वैभव राठोड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.
Nayab Tahsildar case Possible Reason : तणावामुळे टोकाचा निर्णय?
ओळखीच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव राठोड हे मागील काही दिवसांपासून तणावाखाली होते. मात्र त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सर्व शक्य त्या कारणांचा तपास करत आहेत. या प्रकरणात सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.