मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! मुंबई पालिकेची दंडेलशाही… कोळणींचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरते, त्यामुळे यापुढे मासे कापून व स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे विका, अशी सक्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यातील धोबीघाट येथील मासळीविव्रेत्या कोळी महिलांवर केली आहे. अन्यथा कारवाईचा इशाराही दिला आहे. महापालिकेच्या या दंडेलशाहीबद्दल मासेविर्केत्या महिलांमध्येच नव्हे तर कोळी समाजामध्येच संताप व्यक्त होत आहे.

मासे कापू दिले नाहीत तर अनेक ग्राहक विकतच घेणार नाहीत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होईल. याच व्यवसायावर आमचा उदरनिर्वाह चालतो. पालिका अधिकारी आमच्या पोटावरच मारत आहेत, असे त्यांनी सांगितले.

मग कोंबड्या कापायलाही बंदी घाला

आम्हाला मासे कापू नका सांगता, मग कोंबडीवाल्यांनाही कोंबड्या न कापता ग्राहकांना विकायला सांगा. कोंबड्या कापून घाण होत नाही का, असा सवाल कोळी महिलांनी केला आहे.

वाकोल्यात नेमके काय घडले…

वाकोला धोबीघाट परिसरात कोळी महिला मासे विक्रीचे काम वर्षानुवर्षे करत आहेत. बहुतांश ग्राहक मासे विकत घेतल्यानंतर ते कापून किंवा स्वच्छ करून देण्यास सांगतात. मात्र त्यामुळे घाण होऊन जागा अस्वच्छ होते, असे कारण देत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी मासे कापायलाच मनाई केली आहे. पालिकेच्या या मनमानी कारवाईमुळे मासे विव्रेत्या कोळी महिलांमध्ये तीव्र संताप आहे.

Comments are closed.