शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा रविवारी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत ख्यातनाम चित्रकार आणि व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत हेसुद्धा होते. उद्धव ठाकरे यांनी कामत यांना संपूर्ण स्मारक दाखवले तसेच स्मारकात काय काय असेल याची माहिती दिली. कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी यावेळी कामत यांचेही मत जाणून घेतले.
Comments are closed.