मतदान केल्यानंतर गप्प राहिल्या, आता भाजपने बंगालमध्ये मुसंडी मारताच महिला धडाधड बोलू लागल्या, म

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी (West Bengal Election Result 2026) सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भाजप 170 आणि तृणमूल काँग्रेसने 113 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित होत असताना आता बंगालमधील महिलांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

पश्चिम बंगालच्या विद्यमान ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पंधराशे रुपये महिन्याच्या ऐवजी बंगालच्या महिलांनी आपल्या सन्मानाला निवडलं. बलात्कार झाल्यानंतर एखाद्या पीडीतला दहा ते पंधरा लाख रुपये देणाऱ्या ममता बॅनर्जींना महिला मतदारांनी धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालमधील महिला मतदारांनी दिली. (West Bengal Election Result 2026)

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उघडपणे बोलायला सुरुवात- (West Bengal Election Result 2026)

मतदान केल्यानंतर ही प्रतिक्रिया न देणाऱ्या आणि गप्प राहणाऱ्या महिलांनी भाजपची विजयी घोडदौड सुरू होताच ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. एखाद्या योजनेत महिन्याला पंधराशे रुपये देऊन ममता बॅनर्जी महिलांचा सन्मान खरेदी करू शकत नाही. आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये नको, तर सुरक्षा हवी तर काही महिलांनी दिली आहे. तर एखाद्या बलात्कार पीडीतेला ममता बॅनर्जी यांची दहा-पंधरा लाखांची मदत म्हणजे ममता बॅनर्जी यांची असंमवेदनशीलताच होती. असंवेदनशीलतेला मतदारांनी आणि खास करून महिला मतदारांनी धडा शिकवल्याची प्रतिक्रिया महिला मतदारांनी दिली आहे.

आतापर्यंतच्या कलांवरुन निकालाची वैशिष्ट्ये- (West Bengal Election Result 2026)

  1. भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
  2. भाजप इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची चिन्हं
  3. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: पिछाडीवर
  4. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचीही पिछेहाट
  5. भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्त्वात भाजप आघाडीवर
  6. मोदींनी जिथे झालमुडी खाल्ली, तिथे भाजप उमेदवार आघाडीवर

बंगालमध्ये मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास- (West Bengal Election Result 2026)

बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे.  बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत. तर आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपचे हिमंता बिस्वा सरमा हे पुन्हा सत्तेत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Election Result 2026: बंगालपासून, आसाम, केरळ, तामिळनाडू, बारामती, राहुरीपर्यंत….; कुठे कोणाची सत्ता, पहिल्या 2 तासांत हादरवणारे कल, संपूर्ण निकाल एका क्लिकवर

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका, टीएमसी 100 च्या खाली, भाजप 150 जागांवर आघाडीवर

आणखी वाचा

Comments are closed.