मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
रोहित शर्मा MI विरुद्ध LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक करत 6 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या या विजयात दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रायन रिकेल्टनचा (Ryan Rickelton) सिंहाचा वाटा राहिला.
उच्च, देखणा आणि 2⃣ गुण 💙@mipaltan मध्ये त्यांच्या सर्वोच्च धावांचा पाठलाग शिक्कामोर्तब #TATAIPL इतिहास ✌️
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/elXSOvaeig #खेलबिंदास | #MIvLSG pic.twitter.com/G5rSddXCbc
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 4 मे 2026
दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यात मुकलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) लखनौविरुद्ध कमबॅक केले. या सामन्यात रोहित शर्माने 44 चेंडूत 84 धावा ठोकल्या. या खेळीत रोहित शर्माने 7 षटकार आणि 6 चौकार लगावले. प्रकृती खराब असल्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) लखनौविरुद्धचा सामना खेळला नाही. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबईचं नेतृत्व सांभाळलं. गेल्या काही सामन्यातील सलग पराभवानंतर अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला. (Rohit Sharma MI vs LSG IPL 2026)
नीता अंबानी आणि रोहित शर्माची भेट- (Nita Ambani And Rohit Sharma Meet Video)
मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांची भेट झाली. नीता अंबानी यावेळी खूप आनंदी होत्या. रोहित शर्मा समोर येताच नीता अंबानी यांनी त्याला मिठी मारली. तसेच त्याच्या खेळीचे कौतुकही केल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.
मुंबई आणि लखनौचा सामना कसा राहिला? (MI vs LSG IPL 2026)
लखनौ सुपर जायंटसनं प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी पाचवी भागीदारी होती. रेयान रिकल्टन 83 धावांवर बाद झाला. तर, रोहित शर्मानं देखील 84 धावा केल्या. रिकल्टन यानं 6 चौकार आणि 8 षटकार मारले. तर, रोहित शर्मानं 6 चौकार आणि 7 षटकार मारले. एम. सिद्धार्थनं रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा त्यांना 6 ओव्हरमध्ये 52 धावा करायच्या होत्या. सूर्यकुमार यादव देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नमन धीर यानं मुंबईला विजयापर्यंत पोहोचवलं. मुंबईनं 18.4 ओव्हरमध्ये 4 बाद 229 धावा केल्या. लखनौ विरुद्ध झालेला विजय मुंबईसाठी तिसरा विजय ठरला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.