बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA वाढ बातम्या नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारनं बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 0.70 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं हा निर्णय मे ते जुलै 2026 या कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या यूनियनकडून ही वाढ खूप कमी असल्याचं म्हटलं आहे.
महागाई भत्ता किती वाढला?
केंद्र सरकारनं मे ते जुलै 2026 या तिमाहीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 25 टक्क्यांवरुन 0.70 टक्क्यांनी वाढवून 25.70 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर बँक कर्मचारी आणि कामगार संघटना मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.
पगार किती वाढणार?
बँक कर्मचाऱ्यांचा पगार 0.70 टक्क्यांनी वाढल्यानं वेगवेगळी वेतनश्रेणी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात 435 रुपयांपासून 1050 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 48000 रुपयांपासून 117000 रुपयांदरम्यान असेल त्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 435 रुपयांपासून ते 1050 रुपयांपर्यंत वाढ होईल. ही वाढ मोठी नसली तरी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता ट्रेंडनुसार आहे.
कोणाचा पगार किती वाढणार?
स्टेज 1- 48,480 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांचा महागाई भत्ता 435 रुपयांनी वाढेल.
स्टेज 10- 67,160 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांचा महागाई भत्ता 601 रुपयांनी वाढेल.
स्टेज 20- 93,960 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांचा महागाई भत्ता 838 रुपयांनी वाढेल.
स्टेज 25- 1,08,260 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांचा पगार 965 रुपयांनी वाढेल.
महागाई भत्ता कशाप्रकारे ठरला?
इंडियन बँक्स असोसिएशनच्या 2 मे रोजी एक अधिसूचनेनुसार, महागाई भत्ता मार्च 2026 ला संपणाऱ्या तिमाहीतील औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय सरासरी ग्राहक मूल्य सूचकांक (AIACPI-IW)वर आधारित आहे. हा निर्देशांक महागाई भत्त्यात वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसाठी बेंचमार्क मानला जातो.
2026 च्या पहिल्या तिमाहीतील CPI डेटा
जानेवारी 2026 मध्ये सीपीआय 148.6 होता, फेब्रुवारीत 2026 मध्ये थोडी घसरण होऊन 148.5 झाला. त्यानंतर मार्च 2026 मध्ये वाढ होऊन 149.1 झाला. तीन महिन्यांचा सरासरी सीपीआय 148.73 होते. सीपीआय 2016 मध्ये 123.03 होता. त्या तुलनेत सध्याचा फरक 25.70 होता. त्या नुसार मे- जुलैच्या कालावधीसाठी महागाई भत्त्याची वाढ 0.70 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.