मध्यरात्री 3 वाजता नराधमाला उचललं, 500 ते 600 पोलिसांचा ताफा; नराधमाने चिमुकलीला गोठ्यात कुठून,
भोर: पुणे जिल्ह्यीतील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवलं, या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी भिमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलीसांनी मध्यरात्री (Pune Nasrapur Bhor Crime) घटनास्थळाची पाहणी केली. ती चिमुकली नेमकी खेळत कोठे होती, चिमुकलेला आरोपीने कुठून सोबत घेतलं, गाईच्या गोठ्यात नेमका अत्याचार (Pune Nasrapur Bhor Crime) कुठे केला?याबाबत आरोपीला घटनास्थळावर नेऊन पोलिसांनी माहिती घेतली. तर गावातील संतप्त नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पहाटेची वेळ निवडली होती. गावकरी प्रचंड संतप्त असल्यामुळे आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेण्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा निर्णय घेतला होता.(Pune Nasrapur Bhor Crime)
Pune Nasrapur Bhor Crime : घटना स्थळाच्या परिसरात 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा
आरोपी भिमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलीसांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली, त्या पहाटेच्या पाहणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.या गुन्हेगारीचा सिन रिक्रिएशन करत पोलिसांनी तपास केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पहाटेची वेळ निवडली. गावकरी प्रचंड संतप्त असल्यामुळे आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेण्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घेत पहाटे 3 ते 5 या वेळेत ही पाहणी केली. यावेळी घटना स्थळाच्या परिसरात 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
ही लहान मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होती. शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने ती आपल्या नसरापूर येथे आपल्या आजीच्या घरी गेली होती. त्यावेळी 1 मे रोजी तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, ससून रुग्णालयाकडून पिडीत मुलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना नुकताच सुपूर्द केला होता. त्यानुसार, आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी केली. नराधमाने मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. यानंतर आरोपीने मुलीला दगडाने ठेचून मुलगी मेल्याचीही खात्री केली. यावरुन तिची किती निर्घृण पद्धतीने हत्या झाली असावी, याचा अंदाज होतो.
Pune Nasrapur Bhor Crime : निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं कृत्य केलं
नसरापूर प्रकरणातील आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याचे पोस्टमार्टममध्ये अहवालात उघड झाले आहे. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपीने तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी केली व त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केला. (Pune Nasrapur Bhor Case)
Pune Nasrapur Bhor Crime : पुण्यातील नसरापूरमधील नेमकं प्रकरण काय?
सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मध्यरात्री 3 वाजता 500 ते 600 पोलिस नराधमासह पोहोचले नसरापूरमध्ये; चिमुकलीला कसं? कुठून नेलं? गोठ्यात काय घडले? पोलिसांनी शोधली उत्तरे, CCTV समोर #nasrapurnews #भोर #पुणेन्यूज #क्राइमन्यूज #punecrimenews pic.twitter.com/wufMBGTqEZ
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 6 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.