संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपी वाल्मिक कराड-विष्णू चाटेची हायकोर्टात धाव, दोषारोप रद्
संतोष देशमुख प्रकरण: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) यांनी बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या न्यायालयासमोर ठेवल्या आहेत. घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्यात यावे, अशी मागणी वकिलांनी केली आहे. तसेच पुरावा म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची ‘क्लोन कॉपी’ देण्याची मागणीही पुन्हा करण्यात आली आहे. सरकारी पक्ष केवळ त्यांना फायद्याचा असेल तेवढाच डेटा दाखवत असल्याचा आरोप करत, मेहरबान न्यायालयाने स्वतः लॅपटॉप कोर्टात ओपन करून संपूर्ण डेटा तपासावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. तर आरोपी जयराम चाटे याने बीड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, प्रतीक घुले याने जेलमधूनच आपला अर्ज सादर केला आहे. तर विष्णू चाटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Santosh Deshmukh Case: पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार
9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील देण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.