सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, खरेदीदारांना मोठा फटका, जाणून घ्या आजचे दर?
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर हा 152515 वर व्यवहार करत होता, तर जुलै महिन्याचा चांदीचा करार 255826 वर पोहोचला होता. किरकोळ बाजारात, 24 -कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 153210 आणि चांदी प्रति किलोग्रॅम ₹२,५५,१०० दराने व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात ३% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर चांदीने ६% पेक्षा जास्त मजबूत वाढ नोंदवली आहे.
एमसीएक्सवर सोने आणि चांदी दोन्ही विक्रमी पातळीजवळ व्यवहार करत आहेत. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 153210 वर पोहोचला, तर चांदीचा भाव प्रति किलो 255830 वर पोहोचला. मजबूत जागतिक बाजारपेठा आणि वाढत्या मागणीमुळे गुंतवणूकदारांची मौल्यवान धातूंमध्ये रुची वाढली आहे. किरकोळ व्यापारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरात 480 किंवा 0.31 टक्केची वाढ नोंदवत, प्रति 10 ग्रॅम 153210 च्या वर गेले आहेत. चांदीच्या दरात 1750 किंवा 0.69 टक्केची वाढ नोंदवत, प्रति किलो 255830 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहरात सोन्या चांदीचे दर काय?
आणखी वाचा
Comments are closed.