चिमुरडीच्या अंगावर टणक हत्यारामुळे जखमा, पोस्टमार्टम रिपोर्टमधील माहिती, नसरापूरच्या नराधमाकडील

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात (Pune Crime Nasrapur Case) प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. या जखमा टणक हत्याराने केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी काल (गुरुवारी, ता ७) न्यायालयात दिली. नसरापूरमध्ये (Pune Crime Nasrapur Case) एक मेला चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला विशेष न्यायालयाने सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला काल (गुरूवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.(Pune Crime Nasrapur Case)

Pune Nasrapur Bhor Crime : गाठोड्याचा शोध घेऊन त्यात नेमके काय होते?

या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल, आरोपीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल, लैंगिक सक्षमता चाचणी अहवाल, सीसीटीव्ही व्हिडीओ, घटनास्थळाचा पंचनामा आदी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, या जखमा कोणत्या हत्याराने केल्या, गुन्ह्यात त्याने नेमक्या कोणत्या हत्याराचा वापर केला, ते हत्यार हस्तगत करायचे आहे. या प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेनंतर आरोपी गाठोडे घेऊन जाताना दिसत आहे. या गाठोड्याचा शोध घेऊन त्यात नेमके काय होते?, याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

तसेच गोठ्यात जाताना आरोपी आणि मुलीच्या हातामध्ये शेवपुडा दिसत असून, ती शेव त्याने नेमक्या कोणत्या दुकानातून खरेदी केली?, त्याला आणखी कोणी मदत केली का? याचा तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अरुंधती ब्रह्मे यांनी केली. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. मनीष पाडेकर यांनी वकीलपत्र सादर केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ केली.

Pune Nasrapur Bhor Crime :  घटनेनंतर भीमराव कांबळेने नेलेल्या गाठोड्यात नेमके काय होते?

घटनेनंतर भीमराव कांबळेने नेलेल्या गाठोड्यात नेमके काय होते?याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. नसरापूरच्या गुन्ह्यात आरोपीने नेमक्या कोणत्या हत्याराचा वापर केला याचा देखील पुणे ग्रामीण पोलिस तपास करणार आहेत. आरोपीने शेव नेमक्या कोणत्या दुकानातून खरेदी केली, याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावातील दुकानाचा शोध घेतला जाणार आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Pune Nasrapur Bhor Crime : पुण्यातील नसरापूरमधील नेमकं प्रकरण काय?

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.