निवडणूका संपल्यानंतर आता सरकारचा दणका, आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
देशातील पाच राज्यांतील निवडणूकांचा निकाल नुकताच लागला आहे. पाच पैकी तीन राज्यात भाजप सत्तेत आली आहे. निवडणूकांचा निकाल लागताच आता केंद्र सरकार सर्व सामान्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. येत्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि तेल कंपन्यांना होणारा मोठा तोटा पाहता, येत्या 15 मे पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तेल कंपन्यांना दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
मध्यपूर्व देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी ७० डॉलर प्रति बॅरलवर असलेले कच्चे तेल आता १२६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. त्याचा फटका आता हिंदुस्थानला देखील बसणार आङे. सध्या सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे २४ रुपयांचा भार स्वतः सोसत आहेत.
Comments are closed.