चंद्रपूर जिल्ह्यात चार महिन्यांत 258 अपघात तर 109 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. वाहतुकीच्या नियमांचे होत असलेल्या उल्लंघनामुळे चंद्रपुरात अपघाताची संख्या वाढली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 258 अपघात झाले. असून, यात 109 जणांचा मृत्यू, तर 236 जण जखमी झाले आहेत.

मागील दोन दिवसांत चार अपघात झाले. अवैध पार्किंग, वाहतूक पोलिसांची अपुरी तैनाती आणि रस्त्यांची दुर्दशा ही अपघातांची मुख्य कारणे आहेत. अपघातांची मालिका सुरू असतानाही वाहतूक पोलीस निरीक्षक आणि प्रशासन प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आम आदमी पक्षाने वाहतूक पोलीस निरीक्षक यांची तत्काळ बदली करण्याची मागणी निवेदना मार्फत केली आहे.

Comments are closed.