यशस्वी जैस्वालसह वर्ल्ड कप विजेत्या शफाली वर्माच्या अडचणी वाढणार? नाडाने नोटीस पाठवली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा युवा तडफदार फलंदाज यशस्वी जैस्वालला नाडाने नोटीस पाठवली आहे. यशस्वी जैस्वाल सोबत हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची विस्फोटक फलंदाज शफाली वर्माचा सुद्धा या नोटीसमध्ये समावेश आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने या दोन्ही खेळाडूंवर डोपिंग टेस्टला गैरहजर असल्याचा ठपका ठेवला असून त्यांना Whereabouts Failure अंतर्गत नोटीस पाठवली आहे.

यशस्वी जैस्वाल सध्या IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याचा आयपीएलमधील आतापर्यंतचा खेळ दमदार राहिला आहे. दुसरीकडे शफाली वर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये टी20 मालिका खेळली जात आहे. दोन्ही खेळाडूंना डोपिंग टेस्टसाठी तारखा देण्यात आल्या होत्या. 17 डिसेंबर रोजी यशस्वी जैस्वालची डोपिंग टेस्ट करण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र त्याची भेट होऊ शकली नाही. तर शफाली वर्माची 7 नोव्हेंबर रोजी डोपिंग टेस्ट होणार होती, मात्र ती सुद्धा त्यावेळी उपस्थित नव्हती. सध्या हे दोन्ही खेळाडू नोंदणीकृत चाचणी गटात (RTP) असून त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आल्याचे नाडाने म्हटलं आहे. त्यांना यापूर्वी 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी स्पष्टीकरण देण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे आता यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्मा यांना स्पष्टीकरण देण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

IPL 2026 – पुढे धोका आहे… बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना दिली ताकीद

नाडाच्या नियमांनुसार जो खेळाडू 12 महिन्यांमध्ये 3 वेळा डोपिंग टेस्टसाठी गैरहजर राहतो, अशा खेळाडूंवर कारवाई होते. नाडाच्या नियमांचे उल्लंघन केल्यप्रकरणी संबंधित खेळाडूला क्रिकेटमधून दोन वर्षांची बंदी घातली जाते. सध्या यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्मा नाडाच्या रडारवर आहेत. जर यशस्वी आणि शफाली यांच्या नावावर 2 मिस टेस्टची नोंद झाली, तर त्यांच्यावरही क्रिकेट बंदीची कारवाई केली जाऊ शकते.

Comments are closed.