बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्…; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्ह

उल्हासनगर : उल्हासनगरमधून एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. बहिणीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा (Ulhasnagar Crime News) राग मनात धरून सख्ख्या भावाने आपल्या मेव्हण्यावर (Ulhasnagar Crime News) भरदिवसा पेट्रोल पंपावर जीवघेणा हल्ला (Ulhasnagar Crime News)केला. धारदार चाकूने मेव्हण्याच्या पोटात वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने उल्हासनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.(Ulhasnagar Crime News)

Ulhasnagar Crime News: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरचा कॅम्प नंबर ५ परिसर…रोजच्या प्रमाणे वर्दळ सुरू होती. येथील एका पेट्रोल पंपावर नागेश चव्हाण हा तरुण आपली ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याच वेळी काळाप्रमाणे तिथे दोन तरुण मोटार सायकलवरून पोहोचले आणि रक्तरंजित खेळ (Ulhasnagar Crime News) सुरू झाला. नागेशचा मेव्हणा शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान यांनी नागेशला गाठले. काही कळायच्या आतच शकीलने आपल्या कमरेचा धारदार चाकू काढला आणि नागेशच्या पोटात सपासप वार केले.(Ulhasnagar Crime News)

Ulhasnagar Crime News: रक्ताच्या थारोळ्यात नागेश जमिनीवर कोसळला,

रक्ताच्या थारोळ्यात नागेश जमिनीवर कोसळला, तरीही आरोपींचा राग शांत झाला नव्हता. भररस्त्यात, लोकांच्या देखत हा थरार घडला आणि आरोपी तिथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नागेशला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखम खोल असल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला ‘रेफर’ करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांत शकील खान आणि अरबाज खान या दोघांना बेड्या ठोकल्या.(Ulhasnagar Crime News)

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शकील खानने गुन्ह्याची कबुली दिली. “माझ्या बहिणीने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न कसं केलं?” हा राग शकीलच्या डोक्यात धुमसत होता. याच आंतरजातीय विवाहाचा सूड घेण्यासाठी त्याने आपल्या मेव्हण्याला संपवण्याचा कट रचला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.​ आंतरजातीय विवाहासारख्या सामाजिक विषयावरून रक्ताचं नातं विसरून झालेला हा हल्ला आधुनिक समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. आता पोलीस या आरोपींना न्यायालयासमोर हजर करून कठोर शिक्षेची मागणी करणार आहेत.(Ulhasnagar Crime News)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.