वीज अंगावर पडून मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगड जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसाने अनेक तालुक्यांना तडाखा दिला. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी घरांचे व माळमत्तेचे नुकसान झाले असून तळा तालुक्यात अंगावर वीज पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वेदांत साळुंखे (१४) असे मृत मुलाचे नाव आहे.

तळा तालुक्यातील फफ्शेत गावातील वेदांत साळुंखे (१४) हा घरच्या बाहेर खेळत असताना त्याच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुधागड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सहा गावांमधील तब्बल २४ घरांचे अंशतः नुकसान झाले. तसेच कवेळे येथील निलेश तळकर यांच्या पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले असून, शेड उडून गेल्याने सुमारे दीड ते दोन हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. महाड तालुक्यातील कोंडवेत, कांबळे तर्फे महाड, चांबेवकोंड, कोल आणि चांभारखिंड या गावांमध्ये अंदाजे ४० ते ५० घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed.